या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पु० १३] केरळकोकिळ. - हांसणारा पक्षी. [अं॰ ७ mins al कान हालविणे ही क्रिया जनावरांमध्ये आहे, पण ती मनुष्यप्राण्यांत नाही. आणि 'हासणे' ही क्रिया मनुष्यप्राण्यांत असून, ती इतर कोणत्याही प्राण्यांत नाही. येवढेच नव्हे, तर त्या धर्माची कल्पनाही इतर प्राण्यांत असण्याचा संभव नाही. मग आज आमी एका 'हांसणान्या' पक्ष्याचे वर्णन देणार आहों हे कसे ? असा प्रश्न सहजींच उद्भवेल. परंतु ह्या पक्ष्याचे हांसणे ह्मणजे ह्याचा शब्द हुबेहुब मनुष्याचा हांसण्यासारखा आहे येवढाच अर्थ समजावयाचा. तो त्याचा शब्द इतका हुबेहुब आहे की, नवखा मनुष्य तो ऐकून बुचकळ्यांत पडेल इतकंच