या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. नव्हे, तर प्रसंगविशेषीं भूतचेष्टा आहे ह्मणून समजेल. आणि ह्याच तन्हेचे अनुभवही पण आलेले आहेत. आमच्या देशांत पाण्याच्या आश्रयास एक कांही अंशी मोराच्या । रंगाचा-ह्मणजे निळ्या व हिरव्या रंगाचा लहानसा पक्षी बसून तो आकाशांत कांहीं वेळ पंख हालवून पटकन् पाण्यात बुडी मारून चोंचीतून मासा घेऊन जातांना पुष्कळांनी पाहिले असेल. ह्या पक्ष्याची चोंच पिवळसर व लालसर रंगाची असते. ह्या पक्ष्याचे चाषपक्ष्याशी पुष्कळ अंशी साम्य असते. ह्या पक्ष्याला 'खंड्या' असें ह्मणतात. हांसणारा पक्षीही ह्याच वर्गातील आहे. परंतु त्याचा आकार मोठा-चांगला काहळ्यायेवढा-असतो. येवढाच काय तो फरक. ह्याचे वसतिस्थान 'अ. लिया.' येथे हे पक्षी पुष्कळ पहाण्यांत येतात. ह्याचा आकार व रंग मोठा चित्तवेधक असतो. नदीकिनाऱ्यावरील झाडाच्या ढोलीत किंवा रा. रा गीत मातीत बीळ करून त्यांत हा रहातो. ह्याचे मुख्य निवा१० साधन मासे होत. परंतु पाली, सरडे, उंदीर व सर्प हे प्राणी तावडीत सांपडतील तर ते सुद्धां खाण्यास हा कांहीं कमी करीत नाही. ह्या पक्ष्यांत एक विशेष जात आहे. तिचा रंग फारच सुरेख असून तो उन्हामध्ये केवळ इंद्रधनुष्याप्रमाणे चमकतो. हा खंड्याप्रमाणेच पा. ण्याच्या आसऱ्याला, बोरूमध्ये किंवा झाडांच्या जाळीत लपून बसतो, व मासा पाहिला की पटकन् चोंचीने उचलून घेतो, व सगळाच्या सगळा गट्ट करतो. कधी कधी खंड्याप्रमाणेच वर आकाशांत पंख हालवीत स्थीर राहून मासा धरून वर येतो. ह्या पक्ष्याला माशाहूनही जळवा फार प्रिय आहेत. एखाद्या तलावांत जळवा दृष्टीस पडल्या का परे. त्यांचा वेंचून हा अगदी निःपात करून सोडतो. ह्या पक्ष्यामध्ये अद्भुत गुण ह्मणजे हा की, ह्याचा शब्द हुबेहुब म नष्याच्या हासण्यासारखा आहे. त्याचा तो शब्द ऐकून मनुष्यास हास तेच येते, पण त्याची ती त्या वेळेची मुद्रा पाहून तर फारच हासू * झणजे त्याने त्या समयीं चोंच पसरली ह्मणजे त्याच्या चहन्याचा जो आकार होतो, तोही मोठा विलक्षण दिसतो. ह्मणजे जसा एखादा बोंडांत एकही दात नसलेला मातारा मनुष्य हांसतांना आपले बोळके तो किंवा पंच वतमानपत्रांत पंच आजोबांची कधी कधी हास