या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १८९८. गृहस्थ-भजन तरी करावें केव्हां? मुलगा-सोहं मंत्री नाहीं गोवा. गृहस्थ-भजन करावें कोणे दिवशीं . मुलगा-नेम नाही दिवसनिशी. गृहस्थ-मातारपणी भक्ति करूं. मुलगा-आयुष्य काय तुझें आज्ञाधारू गृहस्थ-बोलतें तेंच किरे बोलतोस ! मुलगा-जाबास जाब फार देतोस. गृहस्थ-ऐसें बोलतां देइन काठ्या. मुलगा-अहंकारें होतिल खोट्या. गृहस्थ-तुझा माझा वाद झाला फार. मुलगा-पांच पोरांनी घेतलें घर. गृहस्थ-पांच पोरें कोणाची? मुलगा-आत्माराम गड्याची. गृहस्थ-सारा खेळ त्याचाच किरे ? मुलगा-खेळ खेळून निराळाच नारे ? गृहस्थ-हा खेळ तुला कशाने कळला ? मुलगा-निवृत्तिप्रसाद फळास आला. गुरुशिष्यसंवाद. शिष्य-गुरुजीबुवा, उपदेश करा. गुरु-आत्मा आपण, मौन धरा. शिष्य-शुकादिकी धरिलें मौन. गुरु--त्यांचे बोलणेच मौनाचें मौन शिष्य-असे ते हो कैसे बोल ? गुरु-स्वानुभवाचे सहजीं डोल.