या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १८९९. - १४७ तांना मुद्रा काढलेली असते, त्याच नमुन्याचा त्याचा हुबेहुब चेहेरा दिसतो. ही गोष्ट प्रथमारंभी दिलेल्या चित्रावरूनही बरीच लक्ष्यांत येण्यासारखी आहे. एक युरोपियन गृहस्थ अस्त्रेलियामध्ये गेला होता. तो सायंकाळी सहल करून गांवांत येत असता, त्याच्या बाजूस असलेल्या झाडीत लपून कोणी मोठ्याने दोन तीन मंडळी हांसली असा भास झाला. येथे माझी चेष्टा करणार कोण? असें मनांत येऊन तो गृहस्थ अगदी बुचकळ्यांत पडला. त्याने मागे वळून पाहिले कोणी नाहीं; एक दोन झाडांआड शोधून पाहिलें कोणी नाही. तेव्हां मनांत विस्मित होऊन पुढे चालू लागला. तो पुन्हा ' खो खो खो' आहेच. तेव्हां तर त्याची अगदीच धांदल उडाली. त्याने मनांत पक्की गांठ बांधली की, येथे कोणीतरी बदमाष लोक लपून बसले असावेत खास. ह्मणून पुन्हा धरून तो त्या झाडाखाली गेला, आणि पुन्हा हिकडेतिकडे ॥ ... गला. तो झाडावरून पुन्हा 'खो खो खो' आहेच. त्या वेळेस झांजड पडत चालली होती त्यामुळे, व झाडाचा विस्तारही मोठा होता ह्यामुळे हे पक्षिराजही त्यास दिसले नाहीत. तेव्हां झाडावर कोणीतरी निःसंशय मनुष्ये चढून बसली असावीत असा मनांत तर्क करून तो घरी गेला. त्या रात्री त्याला कशी ती झोंप ह्मणून आली नाही. त्या हांसण्याविषयी त्याच्या मनांत एकामागून एक निरनिराळ्या कल्पना येऊ लागल्या. आणि अखेर, झाडावर तिनसांजच्या वेळेस मनुष्य कशाला बसणार ? असा मनाचा सिद्धांत ठरून ती काहीतरी भूतचेष्टा असावी, अशावर त्याचे पर्यवसान गेले. आणि त्यामुळे त्या गृहस्थास ताप भरला, व त्यांत बडबड सुरू झाली. तेव्हां त्याचे कितीएक मित्र त्यास भेटावयास आले व तें सर्व वर्तमान ऐकून ते हांसूं लागले. येथे एक 'जातीचा हांसणारा पक्षी' आहे तो हुबेहुब मनुष्य हांसल्याप्रमाणे शब्द करतो' अशी त्याची त्यांनी खातरी केली. तेव्हां त्याच्या प्रकृतीस थोडथोडा उतार पडूं लागला. तरी पक्की खातरजमा होईना. त्यास वाटे आपली समजूत पालटण्याकरितां हे काहीतरी सांगतात. अखेर त्याच्या मित्रांनी त्यास एके दिवशी रानांत नेऊन त्या पक्ष्याचा शब्द पुन्हा ऐक.