या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माला अंक ७ वा. जुलै १८९९. श्रीगुरुचें आसन मी वसनें मी मीच भूषणें हार । देवाला सुखवाया होइन मी चंदनादि उपचार ॥ ६१ ॥ होउनियां आचारी वाढिन मीही फराळ युक्तीनें । बाजी श्रीगुरुला ओवाळिन आंगें मी फार फार भक्तीनें ॥ ६२ ॥ पंक्तिस बसेन गुरुच्या भोजनसमयीं नव्हे कधीं भूल । राहुनि पुढे उभा मी देइन त्यांना स्वयेंचि तांबूल ॥ ६३ ॥ उष्टें काढिन हातें घालिन शय्या स्वयें निजायातें । जावोनि मीच तेथें गुरुनाथाच्या चुरीन पायांतें ॥६४ ॥ सिंहासन होतां मी श्रीगुरु बसतील त्यावरी तूर्ण ।। सेवा अशा प्रकारे होइल माझी सदैव संपूर्ण ॥ ६५ ॥ वेधेल सद्रूचे पाहनि जे जे पदार्थ मन फार । जाइन पुढे तयाच्या होउन ते ते स्वयें चमत्कार ॥६६॥ मी शब्दसंघ होइन गुरुच्या कर्णांगणांत जो वर्षे । संघष्टणार्थ आंगा स्पर्शहि होईन मी वयें हर्षे ॥ ६७ ॥ ममता धरूनि हृदयीं गुरु नेत्रे पाहतील जे दृश्य । सकलहि होइन तें तें घेउनि त्यांचेच मीहि सादृश्य ॥ ६८ ॥ ते ते रस मी होइन जे गुरुजिव्हेस लागती मिष्ट । सेवा सद्बंधमि नाकाचीही करीन मी इष्ट ॥ ६९ ॥ प्रत्येक वस्तु होउनि ऐशा रीती मनोदयें रचित । गुरुचे बाह्यमनोगत जाणुनि सेवा करीन मी उचित ॥ ७० ॥ सेवा करीन ऐशी जोंवरि चाले जगांत हा देह । पुढचा विचार अद्भुत कथितां सारा फिटेल संदेह ॥ ७१ ॥ स्वामी सद्गुरु माझे जेथुनि जेथूनि चालुनी जाती। तेथे तेथे पसरिन माझ्या देहीं असेल जी माती ॥ ७२॥ स्पर्शी जलास हर्षे गुरु माझ्या ज्या सदैव सुखखाणी । विरवीन त्यांत माझ्या देहामाजी असेल जे पाणी ॥ ७३ ॥