या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५० केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. ओवाळी गुरुला की, त्यांच्या सदना प्रकाशवी नित्य । दीपांत त्याच ठेविन देहांतिल तेज सांगतों सत्य ॥ ७४ ॥ विलयाला नेइन मी चवरी पंख्यांत आपुले प्राण । मग त्या वायुमि मी गुरुसेवा करिन वाहतों आण ॥ ७९ ॥ श्रीगुरु आकाशी ज्या बसतिल घेवोनि सर्व परिवार ।। आकाश त्यांत माझे घालुनि होईन मी सुखी फार ॥ ७६ ॥ असलों जिवंत किंवा मेलों तरि मी कधी न सोडीन । सद्गुरुची भक्तिकृपा सत्सेवेनें अखंड जोडीन ॥ ७७ ॥ इतरांना गुरुजवळी निमिष न देईन दर्शना जाया । लाविन असेच त्यांना कोट्यवधी कल्प संघ मोजाया ॥ ७८ ॥ ऐसें सदैव धरितो चित्तामाजी अखंड जो धैर्य । वागुन तसेंच ज्याने बुद्धीला आणिलें खरें स्थैर्य ॥ ७९ ॥ ही रात्र की दिवस हा न ह्मणे थोडें बहूत की त्रास । जितकी आज्ञा गुरुची तितका तितका मनास उल्हास ॥ ८॥ तैशी आज्ञा होतां आकाशाहून जो फुगे भारी । तत्काल पार पाडी कामें ती एकटाच की सारीं ॥ ८१ ॥ धावे हृदत्ति पुढे आंग जयाचे करावया मोड । पडुनी इरेस तेव्हां कामहि लावी मनासवें होड ॥ ८२ ॥ कोणे एके काली केवळ पुरवावयास तल्लीला । करि लिंबलोण हर्षे घालुनि खर्ची स्वदेहवल्लीला ॥ ८३ ॥ गुरुदास्यें आंग झिजे प्रेमानें ज्यास पुष्टता वाढे। गुवाज्ञेचे आपण होउनियां स्थान राहतो गाढें ॥ ८४ ॥ गुरुच्या कुलीनतेने होते ज्याला कुलीनता प्राप्त । गरुबांधवसौजन्ये ज्याला सौजन्य से करी व्याप्त ॥ ५ ॥ गुरुसेवाव्यसनाने होतो जो सर्वकालही व्यसनी । निस्सीम भक्ति ह्याला ह्मणती, ह्याहून अन्य ती उसनी ॥ ८६ ॥