या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १८९९. १५१ गुरुसांप्रदाय धर्मचि ज्याला होतात वर्णजनधर्म । गुरुची सेवा होउनि राहे ज्या नित्यकृत्यसें कर्म ॥ ७॥ गुरु हीच तातमाता देव गुरू गुरुच आपुलें क्षेत्र । गुरुसेवेवांचुनियां अन्य जयाचे न पाहती नेत्र ॥ ८ ॥ श्रीगुरुचे द्वारजगीं माझें सर्वस्व हे मनीं समजे। गुरुसेवकांस जो कां निजबंधूच्या समान नित्य भजे ॥ ८९ ॥ गुरुनाम मंत्र ज्याच्या खिळुनी राहे सदैव तोंडांत । गुरुवाक्यावांचुनियां लावी शास्त्रासही न जो हात ॥ ९० ॥ गुरुचरण लागलेला ऐसा जो कां भला बुरा प्राणी । त्याच्याच तीर्थयात्रे त्रिभुवनिचे तीर्थवृंदही आणी ॥९१ ॥ गुरुचें उच्छिष्ट जया मिळतां दैवें सुखावतो धीट । लाभापुढे तयाच्या येतो ज्याला समाधिचा वीट ॥ ९२ ॥ श्रीगुरु चालत जातां पायांपासून जी निघे धूळ । शिरसावंद्य करोनी मोक्षाचे हेच की ह्मणे मूळ ॥ ९३ ॥ किति वाढवून सांगू नाही त्याला खरोखरी पार । भक्तीविषयीं व्यापक-बुद्धी ह्यांतील हेच की सार ॥ ९४ ॥ ह्या भक्तीची इच्छा लागे प्रेमें हिच्याच जो मागें। ऐशा सेवेवांचुनि गोड न कांहीं जया जगीं लागे ॥ ९५ ॥ ज्ञानाला भूषण तो सत्तत्त्वा सदन फार तें उक्त । देवाचा ज्ञानाचा तोच खरा ह्या जगामधे भक्त ॥ ९ ॥ जाणे अशा प्रकारे उघडुनि सारीच आपुली दारें । त्याच्या ठायीं पूर्ण ज्ञान वसे सांगतों तुला बा रे ॥ ९७ ॥ त्या गुरुसेवेचा ह्या चित्तीं अभिलाष फार फार वसे । यास्तव सोडुनि विषया विस्तृत वदलों क्षणैक शब्द असे ॥ ९८॥ हातानें शुद्ध लुला भजनी नाही हवे तसे लक्ष्य । सेवेला पंगु वरी झालोंसें आळसासही भक्ष्य ॥ ९९ ॥