या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. गुरुवर्णनीं मुका मी पुष्ट फुकट वाढली असे सुस्ती। चित्तीं परंतु आहे गुरुभक्तीची खरी खरी वस्ती ॥ १००॥ यास्तव विस्तृत इतुकें पडले हे बोलणे मला भाग । व्हावी क्षमा तयाची की आपण सदय हो महाभाग ॥ १०१॥ जगदुद्धार कराया ज्ञानेश्वर हा दया घन वर्षे । तद्भक्तिज्ञानामृत कोकिळ' देतो जनांसही हर्षे ॥ १०२ ॥ सुलभ वेदांत. (पुस्तक १३ अंक ४ था यावरून पुढे चालू ). १९ भांडूं नका. तंटा करूं नका. तुह्मी आपल्या धर्मावर व समजुतीवर जि. तकी दृढतर श्रद्धा ठेवतां, तितकीच दसऱ्यालाही आपल्या धर्मावर व समजुतीवर श्रद्धा ठेवावयाला मोकळीक द्या. केवळ वाद करूनच तुह्मांला कधी जयही मिळणार नाही, आणि दुसरे लोक आपल्या चुक्याही कबूल करणार नाहीत, परमेश्वर कृपा करतो, तेव्हां प्रत्येक मनुष्य आपआपल्या चुका कबूल करतो. २० एक साधु एका रस्त्याने जात असतां, गर्दीमध्ये त्याचा पाय, एका दुष्ट मनुष्याच्या पायावर पडून त्याचे बोट चेंगरलें. तो दुष्ट मनुष्य अतिशय सता. पला, आणि त्याने त्या साधूस इतके बेदम मारलें की. शेवटी तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. त्याच्या शिष्यांनी त्याची फार शुश्रषा केली. आणि शुद्धीवर येण्याकरिता अनेक उपचार केले. त्याला थोडीशी शुद्ध येत चालली तव्हा त्यांपैकी एका शिष्याने विचारलें ॥ काय महाराज, आतां आपली सेवा काण करीत आहे हे ओळखतें काय ?" त्यास साधनें उत्तर दिलें:-" ज्या ईश्वरान मला मारिलें, तोच माझी सेवा करतो आहे." खरा साधु हटला की त्याला "समः शत्रौ च मित्रे च"-शत्र आणि मित्र दोन्हीही सारखे वाटावयाचे, २१ सर्व पाणी नारायणापासूनच झालेले आहे. तरी प्रत्येक जातीचे पाणी कांही पिण्यास योग्य नाही. त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी परमेश्वराचे वास्तव्य आहे दी गोष्ट जरी खरी, तरी प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याचे दर्शन घेणे मनुष्यमात्रास बोग्य नाही. आपण जसे एका जातीचे पाण्याने पाय धुतों; दुसऱ्याने स्नान करतो; जितिसरें पितो. इतर जातीच्या पाण्यास शिवतही नाही, त्याप्रमाणे स्थान..