या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १८९९. माहात्म्याचेही निरनिराळे प्रकार आहेत. कित्येक ठिकाणापर्यंतच आपणांस जातां येते; कित्येक ठिकाणांच्या अंतर्भागी प्रवेश करता येतो. आणि कित्येक ठिकाणांस लांबूनच टाळा घ्यावा लागतो, ("सर्प विंचु नारायण, परी वंदावे दुरून.") २२ गुरु ह्मणाला "अस्तित्वात असणारी प्रत्येक वस्तु परमेश्वरस्वरूप आहे." शिष्याला त्याचे पढिकज्ञान झाले. पण खरे तत्त्व त्याच्या अंतःकरणांत बिंबले नाही. तो एके दिवशी एका गल्लीतून जातांना समोरून एक हत्ती आला. त्याच्या वरील माहुताने मोठ्याने ओरडून 'बाजूला व्हा, ' 'बाजूला व्हा, ' असें सांगितले. परंतु शिष्याने मनांत असा विचार केला की "मी काय झणून दूर व्हावें ? मी जसा ईश्वर आहे, तसाच हत्तीही ईश्वरच आहे. मग ईश्वराचेंच ईश्वराला भय कसले ?" अशा खातरजमेनें तो जाग्यावरून यत्किंचितही हालला नाही. तेव्हां हत्तीने त्यास सोंडेत धरून बाजूस झुगारून दिला. त्यामुळे त्यास बरीच इजा झाली. तेव्हां तो गुरूकडे गेला आणि त्याने त्यास घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. गुरु ह्मणाला, "बरोबर आहे. तूं परमेश्वर आहेस, तसा हत्ती हाही परमेश्वर आहे; परंतु माहुतरूपी परमेश्वराने तुला आधी सूचना केली होती. तिच्याकडे तूं कां बरें लक्ष्य दिले नाहीस !" २३ एक शेतकरी साऱ्या दिवसभर खणून उसाच्या फडाला पाणी देत होता. सायंकाळी सर्व आटोपल्यावर पहातो तो शेतामध्ये पाण्याचा एक टिपूस गेला नाही. बावरामध्ये उंदरांनी मोठमोठी बिळे पाडली होती, त्यांतून पाणी सारें खाली निघून गेले. जे लोक ऐहिक सुखासाठी--जसें कीर्ति, सुख, संपत्ति, मोठेपणा इत्यादिकांकरिता-ईश्वराची पूजा करणारे आहेत, त्यांची स्थिति अशीच आहे. ते प्रत्यहीं प्रार्थना करीत असले, तरी त्याच्यापुढे त्यांस कांहींच नाही. कारण, ती सारी भक्ति ह्या इच्छारूप उंदरांच्या बिळांत गडप होऊन जात असल्यामुळे, तो यावज्जन्म जशाचा तसा कोराच राहतो. त्याचे पाऊल एक केंसभरही पुढे पडावयाचे नाही. २४ भक्ति करतांना, जे तुमच्या भक्तीला हांसणारे असतील, धर्माची आणि उपासनेची जे टर उडविणारे असतील, त्यांच्यापासून तुझी अगदी अलग रहात चला. २५ दूध आणि पाणी एके ठिकाणी केले, तर ती खरोखर मिसळून जातील. दूध निराळे असें कधींच राखता येणार नाही. तसें आत्मसुधारणेने झालेले एखादें मत, मृत्युलोकच्या नानाविध लोकांत अविचारानें जो मिसळून सोडतो. २०