या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- अंक ७ वा. जुलै १८९९. १६५ हिकडे की तिकडे हालले ह्मणून नाहीत. सरतेशेवटी तो ब्राह्मण फारच चवताळला आणि त्यावर मोठ्याने खेकसून ह्मणाला “कायरे ए गधड्या ! ब्राह्मणाचा आज्ञाभंग करावयाला तुला शरम वाटत नाही का रे? कोण आहेस जातीचा चांभारडा का काय ?" 'चांभारडा ' हे शब्द ऐकतांच त्याच्या आंगांत कांपरें भरलें, आणि घाबय घाबय जोशीबुवास ह्मणाला " बामनुबुवा ! अव बामनबुवा ! मला वळाकलं व वळाखलं. आता मातुर हथ एक पलखबी राहयाचा नाहीं बगा. ह्यो पळालोच." इतके शब्द तोंडांतून पुरते निघतात न निघतात, तो त्याने धूम ठोकलीच, आणि पार दिसेनासा झाला. २९ वाघामध्येही परमेश्वर आहे ही गोष्ट खरी; परंतु आझी जाऊन त्या प्राण्यापुढे उभे राहता कामा नये. त्याप्रमाणे अतिशय दुष्ट मनुष्यामध्येही परमेश्वर राहतो हे खरे; तरी त्या दुष्टाच्या संगतीला लागून आपण त्याचे दर्शन घेऊ नये. ३० जीवात्मा आणि परमात्मा ह्यांच्यामध्ये भेद काय ? पाण्याच्या प्रवाहाभव्य ज्याप्रमाणे एखादी लांकडी फळी आडवी घालावी, झणजे तेच पाणी द्विधा झालेले दिसते, त्याप्रमाणे मायोपाधीने अभेद्य असलेलंच तत्व विभागलेले दिसते. वस्तुतः ते दोन्ही एक आणि एकरूपच आहेत. मा ३१ रात्रीच्या वेळी आकाशामध्ये अनेक तारे आपल्या दृष्टीस पडतात. परंतु सूर्योदय झाला की, त्यांपैकी एकही दृष्टीस पडत नाही. ह्मणून दिवसा आकाशामध्ये मुळीं तारे नाहीतच असें तुमच्याने ह्मणवेल काय ? त्याप्रमाणे हे मनुष्या ! तुझ्या अज्ञानमय दिवसांमध्ये तुला ईश्वर दिसत नाही. ह्मणून ईश्वर मुळी नाहीच असें ह्मणूं नको. ३२ खोलीमध्ये येवढासा प्रकाश आणला पुरे की, आंत भरून राहिलेला आंधार जसा एकदम नाहीसा होतो, त्याप्रमाणे परमेश्वराच्या कृपादृष्टीचा कटाक्ष आपणाकडे वळला पुरे की, हजारों जन्मींची पातकें असली तरी, ती चट सारी लयास जातात. -३३ डोळे झांकणीच्या खेळांत खेळणाराने भोंब्यास हात लावला की तो सुटला. मग हुडकणारा त्याला शिवावयाचा नाही, की चोर करावयाचा नाही. त्याप्रमाणे एकवार परमेश्वराचे दर्शन झालें, झणजे ऐहिक बंधनांनी आझी बद्ध होऊ शकत नाही. भोंब्याला शिवलेल्या मनुष्याला पाहिजे तिकडे जाण्याची जशी मोकळीक असते. त्याला धरायासाठी कोणी मागत नाही, की कोणी त्याला