या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. चोर करीत नाही. त्याप्रमाणे एकदां ज्याने परमेश्वराचे पाय धरले, त्याला ह्या जगद्रूप क्रीडास्थानावर कशाचे भय नाही. तो ह्या प्रापंचिक यातना व काळजा ह्यांतून मुक्त होतो. त्या त्यास कधीही बद्ध करू शकत नाहीत. । ३४ होकायंत्रांतील कांटा थेट उत्तर दाखवित आहे तोपर्यंत तारूं भडकणे कठीण तसें जन्मनौकेतील होकायंत्राचा कांटा जें मनुष्याचे मन, तें जर हाल. चाल न करतां निरंतर परब्रह्माकडेच लागून राहील, तर त्याचे सुकाणू नीट फिरेल, आणि सर्व संकटांतून ते पार पडेल. ३५ मलयपर्वतावरील वायु वाहूं लागला झणजे, कित्येक वृक्ष असे आहेत की, ते पालटून चंदनच होतात. पण बांबू, केळी, वेत असली झाडे, ज्याच्यात . सामर्थ्य नाही, ती तशीच्या तशीच रहातात. त्यांत पालट होत नाही. त्याप्रमाणे जगदीशाची कृपा वळली, की ज्यांच्यांमध्ये भक्तीचें बीज, आणि पुण्याचा साठा असतो एकदम दिव्यदेही होतात, आणि त्यांच्यामध्ये ईश्वरी अंश भरून राहता. पण जे हलके असतात, प्रपंचासक्त असतात ते जसेच्या तसेच रहातात. ३६ एकाच बुडीबरोबर समुद्राच्या तळचें मोती जरी तुमच्या हाती आल नाही, तरी तेवढ्यावरून समुद्रांत मुळी मोत्येंच नाहीत असें अनुमान करू नका। पन्हा पुन्हां बडले झणजे कार्यसिद्धि होते. तद्वत् परमेश्वरप्राप्ताचा प्रयत्न निष्फल झाला, झणून तुमची उमेद खचूं देऊ नका. सारखा अब चालू द्या. झणजे सरतेशेवटी तुह्मांला ईश्वरकृपेची प्राप्ति हाइल. ३७ झाडाचा रोपा लहान असतो तावत्कालपर्यंत शेळ्या, लहान लहान प्राण्यांचा त्यास उपद्रव होऊ नये, ह्मणून फार जपाव पण तोच एकदा मोठा वृक्ष झाला ह्मणजे शेळ्यांचे कळप, गायीचा खच्या आश्रयास रहातात आणि ती त्याच्या पानांवर आपली पाटहा भरतात. तद्वत् तुमच्यामध्ये थोडीशी भक्ति आहे, तोपर्यंत प्रापंचिक विष यांना व दुर्वृत्तींना फार जपले पाहिजे. पण एकदां तुह्मी भक्तीमध्य पार झालांत, झणजे मग विषयांची किंवा कवासनांची तुमच्या ज्ञानप्रभावापुढे य ण्याची मगदूर नाही. येवढेच नव्हे, तर अति दुष्ट असणारे अनेक लोक तुमच्या पवित्र सहवासाने परमेश्वरस्वरूप होतील, ३८ आपण एखाद्या हत्तीचे आंग चांगलें धुतलें, आणि मग त्याला पाहिज तिकडे जाण्यास मोकळीक दिली, तर एक क्षणही लोटला नाही, तोच तो आ पलें आंग घाण करून घेईल. परंतु त्यास धुतल्यानंतर तुझी त्याच्याच जा