या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. शिष्य-स्वानुभव तो कैसा भेटे? गुरु-सद्गुरुकृपेनें संशय फिटे. पण शिष्य-सद्गुरुकृपा होइल कैशी? गुरु-त्याच्या घरची व्हावें दासी, शिष्य-दासीपणा तो कठीण आहे. गुरु-उगीच द्वारीं पडून राहें. शिष्य-द्वारीं पडून होईल काय ? गुरु-येतां जातां लागतील पाय. शिष्य-पाय लागल्याने कोणती सिद्धि ? . गुरु-प्रपंचांतून फिरेल बुद्धि. शिष्य-बुद्धि फिरली कैशी कळे ? गुरु-जें संताचे मिळणे मिळे.. शिष्य-संत सांगा कैसे दिसती? गुरु-लोक स्तवनें संत ह्मणती. शिष्य-लोक स्तवनें होय संत ? गुरु-स्वयें परिक्षनी पहावा अंत. शिष्य-अंत लावल्या कार्य झाले ? गुरु-त्यांची सेवावीं पाउल. शिष्य-पाउलें करिती देव ठावा ? गुरु-लवून प्रश्न करीत जावा. शिष्य-प्रश्न केल्या देव दिसे? गुरु-जनीं वनीं तोचि भासे. शिष्य-तोच भासल्या आपण कोण? गुरु-आपण देव नाहीं दोन.