या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६७ अंक ७ वा. जुलै १८९९. त्याला बांधून ठेवाल, तर तो निर्मळ राहील. तद्वत् एखाद्या साधूच्या संगतीनें तुमचे अंतःकरण पवित्र झाले असून त्याला तुझी विषयी मनुष्यांत मिसळण्याची पाहिजे तशी मोकळीक दिली, तर तुझांस आलेली पवित्रता लौकरच नष्ट होईल. परंतु तुही आपले लक्ष्य एका परमेश्वराच्याच ठिकाणी धरून रहाल, तर तुमच्या अंत:करणावर पुन्हा मल ह्मणून उत्पन्न होणार नाही. ३९ मागणाराचे सामर्थ्य कशांत राहिलेले असते ? तें त्याच्या अश्रूत असते. हट्ट घेऊन रडत बसलेल्या मुलाचा लळा ज्याप्रमाणे आई पुरविते, त्याप्रमाणे ईश्वर आपलें लेकरूं कशासाठी रडते आहे तें देऊन त्याची समजूत करतो. ४० ईश्वराचे चिंतन करा. मग ते एखाद्या कोनाकोपऱ्यांतून करा; एखाद्या ओसाड अरण्यांत बसून करा; की आपल्या मनांत करा, पण करा. ४१ वेळांत वेळ काढून हाताने टाळ्या वाजवून हरीचें मधुर नाम गात जा. हणजे तुमच्या मनाला एकाग्रता प्राप्त होईल. आपण एखाद्या झाडाखाली बसून हरी झणून हाक मारली आणि टाळ्या वाजविल्या तर डाहळ्यावरचे पक्षी जसे भरकन उडून जातात, त्याप्रमाणे तुमच्या मनांतील कुवासना सर्व पळून जातील, ४२ एक अत्यंत दरिद्री लांकुडतोड्या होता. तो दररोज शेजारच्या अरण्यांतून लांकडे तोडून आणी, आणि त्यांची एक मोळी विकून तिच्या तेवढ्या पैशावर पीठ आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर पीठ नाही, अशा कष्टाने दिवस कंठित होता. त्या अरण्यांतून एके दिवशी एक संन्याशी जात होता, त्याने त्या लांकुडतोड्यास पाहिले. आणि त्याला असे सांगितले की, तूं ह्याहूनही ह्या अरण्याच्या आतील भागांत जा. हणजे तुला चांगली मिळकत होईल. लांकुडतोड्याने ती त्या साधूची आज्ञा शिरसा वंद्य केली. आणि पुढे निघाला. त्या जंगलाच्या आंत जातां जातां त्याला चंदनाचें बन लागले. तेव्हां त्याला अत्यानंद झाला. त्याने आपल्या डोक्यावर घेववतील तितके चंदनाचे ओंडके तोडून घेऊन बाजारांत नेले. त्यांचा त्याला चांगला भाव आला. नंतर तो आपल्या मनाशी विचार करूं लागला की त्या भल्या संन्याशाने मला नुसते अरण्याच्या आंत मात्र जाण्यास सांगितले. पण चंदनाच्या झाडाविषयीं तो एक चकार शब्दही बोलला नाही. असें कां बरें ? असा विचार करून तो दुसऱ्या दि. वशी त्या चंदनाच्या बनाच्याही पलीकडे गेला, तेथे त्याला एक तांब्याची खाण सांपडली. तेव्हां त्याने तिच्यांतील तांबें नेता येईल इतकें बरोबर घेऊन बाजारांत नेले आणि विकले, त्याचा त्यास खूप पैसा मिळाला. दुसऱ्या दिवशी तो तां maamies seeMISANgati Homepage Kalida