या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५९ पला आत्मा बाला पाण्याचा कापला आकार अंक ७ वा. जुलै १८९९. ४९ एक मिठाचा, एक कापडाचा, व एक दगडाचा असे तीन निरनिराळे पुतळे तयार केले. आणखी, ते पुतळे नेऊन जर पाण्यात बुडविले, तर पहिला पुतळा पाण्यात विरघळून जाऊन त्याचा आकारच नाहीसा होऊन जाईल. दु. सरा आपल्या आंगामध्ये घेववेल तेवढे पाणी सांठवून घेऊन आपला आकार जशाचा तसा कायम ठेवील. आणखी तिसऱ्याला पाण्याचा कांहींच संस्कार घडणार नाही. जो मनुष्य आपला आत्मा विश्वमय करून आत्मस्वरूपाच्या व्याप्तीने तादात्म्यता पावतो, त्यासारखा पहिला पुतळा होय. झणजे मुक्तपुरुपाची प्रतिमा ती ती. ईश्वरी प्रसादाने आणि ज्ञानाने तुडुंबलेला असा जो एकनिष्ठ भक्त असतो, त्याची प्रतिमा दुसरा पुतळा होय. आणि तिसरा पुतळा ज्याच्यामध्ये सत्यज्ञानाचा एक बिंदु सुद्धां शिरत नाही अशा प्रापंचिक मनुष्याचा असे समजावें. ५० केवळ ग्रंथावलोकनानेच ईश्वराचे स्वरूप ओळखण्याची जो खटपट करतो, तो काशीच्या नकाशावरून किंवा चित्रावरून काशीक्षेत्राची समजूत घालण्याची खटपट करणाऱ्या मनुष्याप्रमाणे समजावा. ५१ एका मनुष्याने एक विहीर खोदण्यास आरंभ केला. तीस चाळीस हात खोल गेली, तरी तींत एकही पाण्याचा झरा दृष्टीस पडेना. ह्याकरितां त्याने तें काम बंद केलें, आणि दुसरी जागा पाहिली. तेथे पहिल्याहनही अधिक खोल खंटले, पण तिच्यांतही पाणी लागले नाही. ह्मणून त्याने पुन्हा दुसरी जागा पसंत केली. आणि तेथे पहिल्याहूनही अधिक खंटले, पण तिच्यांतही पाणी नाहीं तें नाहींच. अखेर कंटाळून सारेच काम त्याने सोडून दिले. ह्या तीन विहिरींची मिळून खोली सुमारे १०० वावांच्या जवळ जवळ झाली होती. घटकेत हिकडे घटकेंत तिकडे असें नाचत बसण्यापेक्षां पहिली विहीर खणतांनाच त्याने थोडासा धीर धरून त्या तिन्ही विहिरीच्या अर्ध्याने जरी श्रम केले असते तरी, निःसंशय तीस पाणी लागले असते, ह्यांत संशय नाही. धर्मासाठी जो मनुष्य आपली वृत्ति वारंवार बदलतो त्या मनुष्याची स्थिति अशाच प्रकारची आहे. आपल्याला त्यांत प्रावीण्य संपादावयाचे असेल तर, त्याच्या गुणाबद्दल कोणताही संशय मनांत न आणतां एका धर्मावरच संपूर्ण निष्ठा ठेवून आपले तनमनधन त्यांत खर्च केले पाहिजे. (पुढे चालू.)