या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. बडोदें येथील ग्रंथसंपादक व प्रसारक मंडळीचा सन १८९७/९८ सालाचा रिपोर्ट. बडोदें येथें मेसर्स दामोदर सांवळाराम ह्या नावाची एक जोमदार कंपनी स्थापन होऊन तिनें ग्रंथसंपादकाचे व प्रसाराचे काम अतिशय नेकीने चालविल्याचे पाहून सर्वांप्रमाणे आह्मांसही अत्यंत संतोष होत आहे. अशा प्रकारच्या कपनाचा आपल्यामध्ये फार आवश्यकता होती. शेट दामोदर सांवळाराम ह्यांचा उत्साह, उद्योग, धैर्य, व टापटीप ही फार तारिफ करण्याजोगी दिसतात. "श्री सयाजीविजय" वर्तमानपत्रही तेच काढित असतात. मा सयाजी विजयाइतकी टापटीप व सुव्यवस्थितपणा मराठी पत्रांमध्ये याच वाट्यास आला आहे. त्यांतील विषयांत समतोलपणा विशेष व आलीकडे पुस्तकपरीक्षणांसारख्या विषयांत मार्मिकपणाची झांक चकमक लागली आहे. हीही आनंदाची गोष्ट होय. तसच - दाघोद्योग आहे, त्यांत ती चांगलेच यश संपादन करील असा भरता. आजपर्यंत मंडळीने जे जे ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत, व प्रसिद्ध करण्या ता घतले आहेत, ते सर्वच जरी आमच्या पहाण्यांत नाहीत, तरी एकदरीत ते सारे निवडक व लोकोपयोगी असेच आहेत. 'मुसलमानी रियासत हा दोनच ह्या मंडळीच्या सेवेची फळे आह्मांपुढे आली आहेत. आणि ती दोन्हीही उत्तम स्वादिष्ट व रसिकांस तृप्ति देणारी आहेत. बाकाच्या नावावरून तीही ह्यांच्याच तोडीची असावीत असें अनुमान करण्यास पुष्कळ प्रकार जागा आहे. ह्यांतील बहुतेक ग्रंथकार मोठमोठे विद्वान्, लेखनपटु व अनुभविक असल्यामुळे मंडळीची आजपर्यंतची सेवा लोकांस पसंत पडली आहे) व पुढे ही पडेल. ह्या मंडळीचे कायमचे वर्गणीदार आजमितीस ४०० आहत. आणखी १००० सुमारे वर्गणीदार मिळाले तर, ह्या मंडळीचा पाया भक्कम १ कायमचा होईल. त्यासाठी ह्या मंडळीने जे नियम केले आहेत. ते फार फायदेशीर आहेत. नवीन वर्गणीदार होणारास प्रथमतः फक्त एक रुपया फी पडत. मात्र पाव आण्यांत ८ पृष्ठेप्रमाणे सर्व ग्रंथ मिळतात. सोनेरी बाइंडिंगचा खच सुखा वर्गणीदारांवर नाही. शिवाय, वर्गणीदारातून पाहिजे तेव्हां नांव काढूनही घेता गते. ही मंडळी चांगले चांगले ग्रंथ निरनिराळ्या ग्रंथकारांकडून छापण्यास पता वस 'वाईकर भटनी' ही दोनच