या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १८९९. व त्या ग्रंथकारास ग्रंथाच्या योग्यतेप्रमाणे १००,२००,५०० रुपयेपर्यंत पारितोषिकही देते. लेखकांच्या उदयाला ही गोष्ट मोठीच उत्तेजक झाली आहे. थोड्या दिवसांपूर्वी श्री सयाजीविजय छापखान्यास मोठी आग लागून ह्या मंडळीचे फार मोठे नुकसान झाल्याचे सर्वविश्रुतच आहे. तथापि शेट दामोदर सांवळाराम ह्यांनी धैर्य खचूं न देता, पुन्हा पूर्ववत् नेटाने उद्योग चालविला आहे. ती त्यांची कर्तबगारी होय. परंतु आमच्या पुढारी, विद्यावृद्धीच्छु, व देशाची कळकळ बाळगणाऱ्या मंडळीनेही आपले कर्तव्य थोडेबहुत तरी बजावले पाहिजे. तें कर्तव्य झणजे ह्या मंडळीस हस्ते परहस्तें वर्गणीदार होण्याच्या, पुस्तके खरेदीच्या कामी किंवा कोणत्याही रूपाने तीस अशा प्रसंगी हातभार लावणे हे. तें करण्यास तीस परमेश्वर बुद्धि देवो, आणि सुदैवाने त्यांचे ह्या अल्प लेखाकडे किंचिन्मात्र तरी लक्ष्य वळो. आह्मी मेसर्स दामोदर सांवळाराम कंपनीने ह्या पाठविलेल्या रिपोर्टाबद्दल आभार मानून तिच्या विषयी आपली पूज्य बुद्धि व्यक्त करतो. ह्यो रिपोर्टीत ह्या कंपनीकडून एक मोठी चूक झाली आहे. ती चूक ही की, तिनं कित्येक ग्रंथ देणारांची जी नांवे दाखल केली आहेत, त्यांच्यांत 'केरळकोकिळ'च्या संपादकाचें ह्मणून एक नांव दाखल केले आहे. ते चुकीचे आहे. ते नांव दाखल करण्यास कंपनीजवळ आधार काय त्याचा खुलासा करावा. नसेल तर ते नांव परत घेऊन चुकीची दुरुस्ती करण्याविषयीं तीस विनंति आहे, तें नांव तिने आपल्या रिपोटीत दाखल केले आहे येवढेच नव्हे, तर केसरीच्या वगैरे पुरवणींतही तें नांव प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे 'केरळकोकिळ' वाचकांचा भलताच समज होण्याचा संभव आहे. 'केरळकोकिळ'चा लेखक आरंभापासून आजपर्यंत जो आहे तो एकच कायम आहे. त्या व्यक्तीचें नांव प्रसिद्ध करण्यांत मोठीशी मातब्बरी नाही. त्याच्या आंगीं लेख लिहिण्याची काही योग्यता आहे, असे लोकांस वाटावयाचे असेल, तर 'केरळकोकिळ'चे संपादक येवढ्या अक्षरांनी काम होईल. व्यक्तीची आवश्यकता कोणती ? बरें; व्यक्तीचे नांव दाखल कराव. याचें तें तरी खरे असावयाचे होतें ? कंपनीच्या पत्रव्यवहारांत केरळकोकिळच्या संपादकाचे खरें नांव दाखल असून ज्या गृहस्थाचा व कंपनीचा कधी पत्रव्यवहारसंबंध सुद्धा नाही, अशा गृहस्थाचें नांव प्रसिद्धपणे कागदावर-उभयतांच्याही परवानगीशिवाय-दाखल व्हावें, ह्याबद्दल आम्हांस अत्यंत दिलगिरी वाटते.