या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १८९९. रूपच आहेत हटले तरी चालेल. ह्मणून ह्या विषयाची चर्चा करण्याचा अधिकार भलत्यालाच प्राप्त व्हावयाचा नाही, व तो कोणी उतावीळपणाने आपल्याकडे घेण्याचा प्रयत्नही पण करूं नये. सुरस गोष्टी, व कल्पित कादंबऱ्यांप्रमाणे पटकर मनावर संस्कार ह्याच्याने कधीच होणारा नव्हे. ह्यासाठी त्याचे पुनःपुनः मनन करणे हेच उचित होय. ह्या पुस्तकाच्या प्रथमारंभीच 'अनंतवृक्षा'चें एक सुंदर चित्र दिले आहे. त्यावरून 'जीव'तत्वाची व 'ब्रह्मतत्त्वा'ची ओळख होण्यास चांगलेच साधन होते. व श्रीमद्भगवद्गीतेतील 'ऊर्ध्वमूलमधःशाखं' ह्या वृक्षाची कल्पना मनांत चांगली बिंबते. ह्या वृक्षाच्या 'डिझाइन'बद्दल जठार ह्यांची तारिफ करणे रास्त आहे. विषयविवेचनांत पुरुष व प्रकृति आणि नाम व रूप ह्या चार विभागांचें कथन आहे. पहिल्या विभागांत सत्, चित् आणि आनंद ह्या तीन गुणांचे एक्यरूप चांगल्या रीतीने सिद्ध केले आहे, त्यानंतर प्रकृति झणजे माया, हिचे स्वरूप सागून ॐ ह्या नामाचा महिमा फारच विस्ताराने सांगितला आहे. त्यानंतर बिंदूपासूनच रेषा व आकृति उत्पन्न होतात. व त्या सर्वांचा बिंदू शब्दांतच समावेश कसा होतो, हे गणितशास्त्रदृष्टयाही स्पष्ट करून दाखविले आहे. त्यावरून गणितशास्त्राच्या व्याख्यांची कशी लटपट उडते ते पहावयास मिळून मनास मोठा चमत्कार वाटतो, व अद्वैत सिद्धांत किती व्यापक आहे, हीही गोष्ट मनांत बिंबण्यास कारण होतें. ॐ ह्या नामाचे विवरण त्यांनी पुष्कळच मौजेचे केले आहे. ॐ हे 'ओ' असें न लिहिण्याचे कारण सांगून त्याचा आकार आठ तुकड्यांनी कसा बनतो तेंही दाखवून दिले आहे. व त्याच आठ तुकड्यांनी स्वर, वर्ण, अंक कसे निर्माण झाले ते आकृतींनी पुढे मांडले आहे. येवढेच नव्हे तर, जारज, उद्भिज, स्वेदज, अंडज-ह्मणजे मनुष्य, झाड, कीटक, पक्षी ह्यांचा आकार सुद्धां ॐ काराने कसा व्याप्त आहे ते परीप्रकारच्या आकृतींनी दाखवून दिले आहे. ते पाहून श्री. जठारांच्या कल्पनेची तरी धन्यता वाटल्यावांचून राहणार नाही. शेवटच्या भागांत प्रकृतिपुरुषांच्या गुणांचा पूर्णपणे ठसा मनांत उभा रहाण्यासाठी, नाटकाचे रूपक रचले आहे. ते अत्यंत चित्तवेधक असून त्याच्यावरून सर्वव्यापी परमेश्वर मायारूपी कसा बनला आहे त्याचा मनास तात्काल बोध झाल्यावांचून रहात नाही. वेदांताचा विषय झटला हणजे अनंताचे अनंतत्त्व सांगण्याचा आहे. तो केवळ शंभर पृष्ठांतच संकलित