या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. काव्यकूटाची उत्तरें. -पुरवणीरा. रा. मल्हार कृष्ण करोसीकर यांजकडून, मु. गडइंग्लज-इ. करवीर, श्लोक. (शा. वि.) बा ! रे ! केरळकोकिळा ! प्रियकरा ! आनंददायी खरा होसी तूं सकलां जनां प्रियवचें, की तोषवी त्वद्राि । काव्यीं कूट असे कथीत अकरा, अंकी स्वयें वाचिला द्यावें उत्तर वाटतें मज सख्या ! आलों वदाया तुला ॥१॥ भासे दिव्य लता निदाघसमयीं जी देतसे दर्शना पाहोनी नवकांति कौतुक गमे सर्वां जनांच्या मना । मोठी भ्यासुर गर्जना करुनियां नादा भरी अंबरी जाणे ती गगनांगणी रमतसे विद्युल्लता सुंदरी ॥२॥ दृष्टीतें दिपवी समूल खपवी धैर्या हरी वैखरी जीची शक्ति अगाध नाम चपला, सौदामिनी यांपरी । राहोनी सकलां सजीव शरिरी अदृश्य तत्वांतरी जाणे ती गगनांगणी रमतसे विद्युल्लता सुंदरी ॥ ३ ॥ क्षोभोनी धरणीतलावरि पडे वेगें जयीं चंचला किंवा पर्वतमस्तकी तरुवरी तुंगप्रपाती शिला । भेदोनी करि पूर्ण चूर्ण सकलां जाळून टाकी खरी जाणे ती गगनांगणी रमतसे विद्युल्लता सुंदरी ॥ ४ ॥ ही साक्षात परमेशशक्ति अतूला चाले न की कल्पना मोठे शोधक लोक जाण थकले शांती न ये तन्मना । ऐसें हैं कवितांत उत्तर पहा अपीतसे अल्पधी होवो मान्य तुला सुखांतरिं सदा राखो पिनाकी सुधी ॥ ५ ॥ रा. रा. बाळकृष्ण अनंत भिडे यांजकड़नः- मु, मुरूड-जंजिरा. श्लोक. (शा. वि.) वर्षाकाल निघे प्रतिध्वनि रिघे मेघस्वनाचा तधीं सत्तेने नटली पयोदपटली नाचोनि हर्षामधीं । देई जी जलदा रमापतिपरी कांती वरी तत्त्वतां ती 'पोता' दिसती अतीव लसती होईल विद्युल्लता ॥ १ ॥