या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १८९८. २५५ काफर लोक. काबूल ( अफगाणिस्थान)च्या ईशान्य दिशेस काफरिस्थान नांवाचा एक लहानसा डोंगराळ प्रदेश आहे, तेथे राहणाऱ्या लोकांस मुसलमान लोक काफर असें ह्मणतात. असें ह्मणण्याचे कारण, हे आहे की, इस्लामावर त्यांचा विश्वास नाही. हे लोक बकऱ्यांच्या काळ्या लोकरीचा पोषाख करतात. यावरून त्यांस 'शियाहपोश' अथवा "कृष्णवस्त्री-काळे वस्त्र पांघरणारे-" असें ह्मणतात. हा कालपर्यंत त्या देशाविषयीं अगदी थोडकीच माहिती सांपडते. इ० स० १८८३ सालापर्यंत एकाही युरोपियनाचें पाऊल तेथे पडले नव्हते. त्यांत विशेषतः मुसलमान लोकांची तेथें गति होण्याची मारामारच. भोळसर मुसलमान लोकांत, एखाद्या काफराचा शिरच्छेद करणे, हे एक मोठे पवित्र कृत्य समजतात. तसेच काफरिस्थानचे लोक, त्यांच्यापैकी एखाद्याने निदान एकतरी महमदी धर्माचा मनुष्यबळी घेतल्याशिवाय, त्यास कोणत्याही प्रकाराने विचारीत नाहीत. त्यांची जी कांहीं आवडती गाणी आहेत, त्यांपैकी एका गाण्यांत, एका काफर मनुष्याने आपला मुलगा एका मुसलमानास कसा विकला, ह्याविषयीं वर्णन आहे. पुढे तो मुलगा वयांत आल्यावर, त्याने चौदा मुसलमान बळी घेऊन, आपल्या घराला तो जीव घेऊन परत आला. तेव्हां त्या विजयानंदांत त्याची आई गाणे ह्मणते. त्यांतील आशय असाः ('दुःशासन बाळक माझें' ह्या चालीवर.) तूं धन्य ! धन्य ! मम बाळा ! समरी तव तेज विराजे ॥ध्रु०॥ शौर्याचा पर्वत जो तूं: जनके तव विक्रय केला । मम वृद्ध जीव हा तेव्हां । त्वहुःखं तिळतिळ तुटला । परि चवदा यवनरिपंची, शिरकमळे तोडुनि आला । घंटिका किणी किणि वाजे । तव पायीं फारचि साजे । परतोनि सदन में माझें । झाले रे बाळा ताजें ॥१॥ तूं धन्य ! धन्य ! मम बाळा : समरी तव तेज विराजे॥ध्रु०॥