या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १८९९. आकाशी उगवे पयोधरसवें वाढोनि भारी जवेंजी स्पष्ट क्षणिं नष्ट होइ भुवनीं आश्चर्य हे संभवे । जी लोकां न कधीं रसेवरि दिसे रानावनां धुंडितां जी 'पोतास' हवी असे विलसती ती तीच विद्युल्लता ॥२॥ जीचा होय प्रभाप्रभाव अतुल, श्रेष्ठत्व जी मीरवी तेजां संचरवी क्षणांत हरवी ध्वांतौघ जैसा रवी । फोडी जी दगडां गडां अवजडां वेगें पडोनी स्वतां जी 'पोतास' हवी असे विलसती ती तीच विद्युल्लता ॥ ३ ॥ रा. रा. परशुराम सीताराम सबनीस, हेडमास्तर, हुबळीः-यांजकडून: श्लोक. (शा. वि.) आहे नाम तुझे खरेंच जगतीं संपूर्ण विद्युल्लता तूं आहेस समग्र सृष्टिमधल्या वस्तूंत गे तत्त्वतां । आकाशी ढग येउनी घसरती ते एकमेकांवरी तेव्हां सुप्रभ वेलिच्या परिजना तूं दीससी सत्वरीं ॥ १॥ रा. रा. स. धों. तांबे-देवगड यांजकडून: श्लोक. पोतासी तव नाम मी कथितसें आज्ञा तुझी मानुनी आहे सत्य असत्य की बघ गडे पोताकडे जाउनी। तूंतें बोलति ह्या जगीं जन असें सर्वत्र विद्युल्लता तूंतें ओळखिले पहा खुण दुजी तूं देवकीची सुता ॥१॥ रा. रा. स. वि. नाशिक, यांजकडूनः श्लोक. बाई दैवबळें गमेचि घडलें, खासें तुझें जन्म हे देवी देवकिकुक्षिं मातुलकरी, वांचीवले चिन्मयें। चापल्ये अरिच्या करी बहु तुरी देवोनियां सत्यता राखी जी हरिची वदूं तव किती, विद्युल्लते धन्यता ॥१॥ मेघांनी हरिलें तरीहि शशिच्या, तेजासि इच्छाबळे फोडोनी घनवारिसंचय तदा, दावी स्वतेजा बळें । जी शक्ती सुलभा नसे समजण्या, ना मोजण्या तत्त्वतां यंत्रे दीप सुसाध्यकारक तुझी, वणू किती धन्यता ॥ २॥