या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ. पु० १३] oser [अं०८ उत्तरध्रुवाकडील अद्भुत तेजोवलय अॅरोरा बोरिलिस. अहो नवनवाश्चर्यनिर्माणे रसिको विधिः । -कथासरित्सागरेभगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायांत अनंतवृक्षाची उपमा संसाराला दिली आहे. तीच जर अखिलविश्वाला दिली, तर प्रत्येक गोल, फलाच्या ठिकाणी उत्तम शोभेल, अशा सुंदर व रम्य अनंत फळांनी हा विश्ववृक्ष लटकला आहे. आणि चमत्कार हा की, त्या प्रत्येक फळाला देंठही पण आहे. आमच्या ह्या पृथ्वीला-भूगोलाला त्यांतलेच एक फळ कल्पिलें, तर उत्तरध्रुव हा त्याचा देंठ होय. ध्रुवाचें स्थिरत्व, पृथ्वीच्या प्रदक्षिणा, होकायंत्राचा रोख ही मनांत आणिली ह्मणजे ही उपमा खरोखरच फार समर्पक दिसते. पृथ्वीच्या मध्यबिंदूकडे गुरुत्वाकर्षणाची एक शक्ति आहे खरी, पण उत्तरध्रुवाकडे आकर्षिल्या जा