या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७० केरळकोकिळ, पुस्तक १३ वें.. णाऱ्या शक्ति, तिच्याहूनही मनास थक्क करणाऱ्या आहेत. असा युगान् युगें कायम राहणारा जो उत्तरध्रुवरूप पृथ्वीचा देंठ, तो आश्चर्यसमुद्राने तुडंब भरलेला आहे. तेथील देखावा मानवी कल्पनेच्या पुष्कळच बाहेरचा आहे. त्याचे वर्णन एकदोन प्रसंगी आमी दिलेही आहे. तथापि तेथच्या वर्णनानें पुस्तकेंच्या पुस्तकें भरली, तरी त्यांतील चमत्कृतीची नवाई ह्मणून लेशमात्रही कमी व्हावयाची नाही. ह्मणून वर निर्दिष्ट केलेल्या तेथील तेजोवलयाचे वर्णन आज देत आहों. जगांतील आश्चर्य ही विधात्याच्या लीलेची प्रतिबिंब, आणि कौतुकाची मूर्तिमंत साक्ष होत. नानाविध आश्चर्य पूर्वकालीं होऊन गेलीं, आज आहेत, व पुढेही नवीं नवीं घडून येतील. आश्चर्य नाहीं कोठे ? 'जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी' सूक्ष्मदृष्टीने अवलोकन केले असतां तें अजरामर असलेले दृष्टोत्पत्तीस येईल, व येतही आहे. सूर्य, चंद्र, पृथ्वी, तारे ही आश्चर्यच नव्हेत काय? हीचशी काय, पण पशु, पक्षी, झाडे, यःकश्चित् कृमिकीटक सुद्धा आश्चर्यच आहेत. नुकतेच आझी जें डांसाचे सचित्र वर्णन दिले आहे. त्यांत काय थोडे चमत्कार आहेत ? जेथे जेथें ह्मणून रमणीयता आहे. तेथे तेथें आश्चर्य हे वास्तव्य करीत असावयाचेच. कित्येक गोष्टी पावलोपावली आमच्या नजरेस पडतात, ह्मणून त्यांची आमांस तितकी किंमत वाटत नाहीं, व दृश्य गोष्टीच्या किंचित्ही पलीकडे जाण्याची फारशी खटपट करीत नाही. ह्मणून त्यात मुळीच आश्चर्य नाही असे कधीच ह्मणतां येणार नाही. फार तर काय ! पण यःकाश्चत् दगडात सुद्धां तें वास करीत आहे. कसे ते पहा. तो ज्या मृन्मय वस्तूंचा बनलेला असतो, त्यांचे सूक्ष्म परमाणू त्यात एकत्र होऊन राहिलेले असतात. ते असे ठेचून राहण्यास त्याच्या आंत काहीतरी शक्ति असली पाहिजे. तीस 'संघशक्ति' असे ह्मणतात. ती जर पदार्थमात्रांत नसती, तर आजकाल पृथ्वीवर एकही दगड दिसताना. डोंगर, पर्वत सर्व लयास गेले असते. हे तर काय, पण आपण ज्या पृथ्वीवर वावरतो आहों, ती तरी अस्तित्वांत असती का नसती ह्याचा वानवाच आहे. ह्यावरून ज्याची आपणास मुळीच किंमत वाटत नाही, त्याच एका दगडांत येवढ्या एका गोष्टीनें-शक्तीने-केवढें आश्चर्य निर्माण झाले पहा. मग जेथें विशेष त-हेचे व मनास चटकन् ।