या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगस्ट १८९९. वेधून टाकण्यासारखे आश्चर्य असेल, त्या वस्तूविषयीं तर बोलणेच नाही. त्याला अद्भुत, अपूर्व, लोकोत्तर पाहिजे ते ह्मणतात. अशा वर्गातीलच 'अरोरा बोरीलिस' आहे. 'सप्तचमत्कार' ह्मणून पूर्वीपासून प्रसिद्ध मानलेले आहेत. परंतु सांप्रत सुधारणादेवीच्या दिव्य दृष्टीने सातांचे आजमितीस सातशे चमत्कार झाले आहेत, व प्रत्यहीं आणखी त्यांत भर पडतेच आहे. आमच्या प्रचंड नगाधिराजाची शेखी त्यांतच; चीनच्या अवाढव्य भिंतीचा बडेजाव त्यांतच; ताजमहालाचे अप्रतिमत्व त्यांतच; पिसा येथील झुकत्या मनोन्याचा झोंक त्यांतच; असे शेकडो चमत्कार होऊन बसले आहेत. पण त्यांत मानवी कृतीचे फार धरले आहेत, व ईश्वरकृतीचे थोडे धरले आहेत. पण किती केले तरी, ईश्वरी कृतीची सर मानवी कृतीस येईल काय ? ज्याने एका जलबिंदूंत लाखों मनोहर निरनिराळे सजीव आकार निर्माण केले, त्याच्यापुढे हजारों वाफेची इंजिनें, कोट्यावधि विद्युद्यंत्रे लावून रात्रंदिवस कष्ट काढून जन्माचे जन्म खर्ची घालून "यावच्चंद्रदिवाकरौ” यत्न केले; पृथ्वींतील सर्व प्राणिमात्रांचे अपूर्व असलेले बुद्धिकौशल्य एकत्र करून कितीही आश्चर्ये निर्माण करण्यास . मनुष्यप्राणी बसले, तरी त्यांच्याने ईश्वरी कृतीच्या एका केसाचीही बरोबरी होऊ शकणार नाही. परमेश्वरी चमत्कार असे आहेत की, त्यांतील एकापुढे मानवांची हजारों कृत्ये काळीठिक्कर पडतील; आपल्या दिव्यप्रभेने मानवी दृष्टीस दिप्प करून सोडतील; आणि आपली अपूर्व रमणीयता त्याच्या हृत्पटलावर अनंतकाल खोदून ठेवतील. शुक्र, गुरु, मंगल, सूर्य वगैरे तेजोगोल ह्याच गोष्टी पृथ्वीच्या आद्यकालापासून साक्ष भरित आहेत. अशाच साक्षीभूत चमत्कारांपैकी उत्तरध्रुवाकडे असणाऱ्या एका तेजोवलयाचा चमत्कार आहे. त्यासच 'अरोरा बोरिलिस' असें ह्मणतात. - आमच्या वाचकांस माहित असेलच की थेट ध्रुवाकडे-मग तो कोणताही-दक्षिणध्रुव असो, की उत्तरध्रुव असो; परंतु दक्षिणध्रुवाकडे-मनुप्याची गति नसल्याने ह्या प्रसंगी विशेषेकरून उत्तरध्रुवाविषयींच भाग घ्यावयाचा किंवा त्याच्या अगदी नजीक, आर्टिक महासागराकडे असे कांहीं प्रदेश आहेत की, तेथे आपल्या देशाप्रमाणे वेळच्यावेळी सूर्यप्रकाश मिळत नाही. तेथे सूर्योदय होणे झणजे 'षण्मासिंचा वायदा'