या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७२ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. अशी अवस्था ! सहा महिन्यांची रात्र व सहा महिन्यांचा दिवस ही तेथची स्थिति ! आमची बारा चौदा तासांची रात्र सुद्धा आह्मांस कधी कधी अगदी कंटाळवाणी होऊन जाते. मग सहा महिन्यांची रात्र ज्यांच्या कपाळी आली असेल, त्यांनी ती कंठावी तरी कशी? त्यांतून येवढ्या कंटाळवाण्या रात्रींत आमच्या येथील अमावास्येसारखा घनतिमिर माजलेला असला, तर मग काय बोलणेच नाही. तसे असेल तर तेथील दुर्दैवी मनुष्ये जगणेही कठीणच ! आणि जगली तर, त्यांस इतकी अडचण व दुःखें सोसावी लागतील की, त्यास पारावार नाही. परंतु दयेची मूर्ति जो परमेश्वर, त्याला दरोबस्त प्राणिमात्रांची काळजी आहे. तो त्यांची उपेक्षा कशी करणार ? त्याने त्यांच्याकरितां जी तजवीज केली आहे, ती केवळ अश्रुतपूर्व होय. चंद्रही नव्हे, सूर्यही नव्हे; वीजही नव्हे व तारेही नव्हेत; अशा प्रकारचें तेथें एक तेज निर्माण करून ठेवले आहे. ह्मणजे एखाद्या राजाने आपल्या प्रीतींतल्या लोकासाठी, किंवा एखाद्या विविक्षित अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी नवाच कायदा काढावा, त्यांतलाच हा एक प्रकार होय. ह्या अपूर्व तेजाचा तेथील लोकांस सूर्यप्रकाशासारखाच उपयोग होतो ह्मणण्यास हरकत नाहीं. पौर्णिमेच्या चांदण्यापेक्षाही में तेज अधिक तेजखी व रमणीय असते. अरोरा बोरिलिसने तेथील प्रदेशाची शोभा केवळ अप्रतिम दिसते. पुराणांतरी केलेले कैलासाचे वर्णनही त्या सृष्टसौंदर्यापुढे खाली मान घालील. सहा महिने एकसारखा उदित असलेला सूर्य नुकताच अस्तंगत होऊन थोडथोडा आंधार पडं लागला, व हिवाळ्याची थंडी आपला करडा अमल गाजवू लागली. ह्मणजे शरच्चंद्राप्रमाणे निर्मळ झरझरादक गाठून जातात; शेवाळ जागच्या जागी थिजन राहते: जिकड तिकडे पांढरे शुभ्र बर्फ व बर्फाचे स्फटिकवत् पर्वत दिसू लागतात; अशा वेळी अकस्मात् हे तेज प्रगट होते! चोहोंकडे एकदम लख्ख प्रकाश होतो. जिकडे तिकडे स्फटिकतुल्य पर्वत, आणि त्यावर ही कोमलप्रकाशाची झांक ! मग तो देखावा काय सांगावा? हीरपर्वताच्या मध्यभागीं आपण जणों काय इंद्रपदावरच बसलो आहोत असे वाटते. हा नवा, सुप्रभ, व सुखकर प्रकाश फांकू लागला की, रात्री हिंडणान्या पारध्यांस उत्तेजन येते. आणि जे धनगरलोक समुद्रकाठी शेकोटी पेट