या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगस्ट १८९९. १७३ वून शेकत बसलेले असतात, ते आनंदानें आपआपल्या कामास लागतात, आणि 'पांथान् प्रभाते प्रपलायतेद्य' ह्या संस्कृत कव्युक्तीप्रमाणे वाटसरू लोक पहांट झाली असे समजून मार्गक्रमणास आरंभ करतात. ह्यावरून त्यास 'उत्तरेकडील सुप्रभात' असें तिकडील लोकांनी एक अन्वर्थक नांव दिले आहे. या अरोराच्या प्रत्येक कोनाकोपऱ्याचे वर्णन करणे केवळ अशक्य होय. तथापि कांहींशी कल्पना येण्याला खालची माहिती बरीच उपयोगी पडेल. प्रथमतः आकाशांत उत्तरेच्या बाजूस एक तेजोमय ढग आल्यासारखा दिसू लागतो. पण तो अतिशय चंचळ असतो. घटकेंत पूर्वेकडे तर घटकेंत पश्चिमेकडे असे त्याचे सारखें भ्रमण सुरू असते. केव्हां केव्हां तो क्षितिजापासून ४० अंशांवर असतो. त्याचा विस्तार सारखा वाढत असतो. विस्ताराचे प्रमाण ५० अंशांपासून १०० अंशांपर्यंतही चढतं. त्याचा आकार अर्धचंद्र असतो. ह्या ढगाचा वरचा भाग-मणजे कमान-सुप्रकाशित असते. वर दिलेल्या चित्रांतील अर्धचंद्राकृति तेजोवलय ते हेच होय. हे कधी कधी अति तेजःपुंज दिसते, पण तें अस्थिर असते. ह्या ढगाचा खालचा भाग नेहेमी गर्द काळ्या रंगाचा असतो. आणि त्याच्या खालपासून क्षितिजापर्यंत खच्छ आकाश लागून रहाते. त्याच्यावरच्या भागापासून प्रकाशाचे स्तंभासारखे धोतच्या धोत येत असतात. पण त्यांत चंचलता किती ? आतां थोडेसें येथें, तर लागलीच कांहीं विषुववृत्तावर व कांही तर त्याच्याही पलीकडे ? ह्या प्रकाशमान ज्योतींनी सर्व वातावरण भरून गेलेलेही केव्हां केव्हां दृष्टीसं पडते. आणखी सर्व नक्षत्रसमुदायाचा मेरुमणी जो ध्रुवतारा, त्याच्या भोंवतीं तर हे शुभ्रतेजोमय बाहुटेच फडकत आहेत असे वाटते. ते सर्व एकत्र झाले झणजे एक मोठा लोळच्या लोळ उठल्याप्रमाणे दिसतो. किंवा प्रकाशस्तंभ एकमेकांस जोराने मागे हटवीत आहेत असे वाटते. हे प्रकाशस्तंभ किंवा प्रकाशरेषा ह्यांस क्षणमात्र स्थिरता नसते. त्या घडीघडीस नृत्यकलाप्रवीण वारांगनेप्रमाणे हिकडून तिकडे, तिकडून हिकडे एकसारख्या नाचत असतात. ह्मणून त्यांस 'मेरीड्यान्सर्स'-खुपदील नृत्यांगना-असेंही एक नांव पडलेले आहे. कधी कधी इंद्रधनुष्याप्रमाणे यांत नवरत्नांचे-अर्थात् निरनिराळ्या रंगांचे-फारच मनोरम स्तंभ