या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. जोडल्याचा भास होतो. हवा कुंद झाली, आणि तुफानी वारा सुटला, झणजे मग ह्यांचे हे नृत्य फारच झपाट्याने सुरू होते. ते पाहिले ह्मणजे असे वाटते की, ह्या दिव्यांगना त्या पवनराजाला प्रेमानें आलिंगनच द्यावयास जात आहेत. ह्या अद्भुत देखाव्याबद्दल तद्देशीयांचा समज मोठा चमत्कारिक आहे. ते ह्मणतात "आमचे वाडवडिलांचे-मृतांचे-आत्मे भुतें होऊन ते दिवट्या घेऊन नाचतात !" हे अरोरा तेज उत्पन्न होण्याचे कारण काय, त्याचा अद्याप बरोबर शोध लागला नाही. तथापि उत्तरध्रुवाकडे लोहचुंबकाचा एक मोठा पर्वत असावा, असे शास्त्रवेत्त्यांनी अनुमान काढल्याचे वाचकांसही माहित असेलच, व तोच तर्क अरेबियननाइटच्या गोष्टीमध्ये घेतलेला आहे. ह्याच पर्वताच्या योगाने होकायंत्रांतील कांटा नेहेमी उत्तरेकर्ड राहतो. ह्या पर्वताशी ह्या अरोरा तेजाचा संबंध असावा असे कितीएक शास्त्रवेत्त्यांचे मणणे आहे. असो. जगन्नियंत्याच्या एका एका अपूर्व योजनेनें मानवांचे चित्त अगदी थक्क होऊन मति कुंठित होते ह्यात तिळमात्र शंका नाही. निस्सीम पुत्रप्रेम. भुजंगप्रयात-लोक. निराकार साकार हा ज्यांस वाद । अशी दैवतें देति कैंचा प्रसाद ॥ घरी चालती बोलतीं सौख्यराशी। पिता माय ही दैवतें ह्यां नरांशीं ॥१॥ घडे सर्वदा पुण्य यद्दर्शनाचें । जयां सेवितां क्लेश जाती मनाचे ॥ उपेक्षील जो आपुले मायबाप । तयासारखे कोणतें घोर पाप ॥ २ ॥ भजेना अवज्ञा करी मायबापी । तयासारखा कोण चांडाळ पापी ॥ खडे फोडिती मायबापें सदैव । तया काय घेईल दारांत देव ॥ ३॥ पिता माय ज्यांची करी अन्न अन्न । तया काय होईल देव प्रसन्न ॥ घरी मारुनी मायबापांस लाथा । जळो टेंकणे ईशपादांस माथा ॥ ४ ॥ भने वैभवें माय ताता स्मरेना । पडोनी शिरी वीज कां तो मरेना ॥ नको तो मला कृष्ण विष्णू अनंत । खरी दैवतें माझिं हीं मूर्तिमंत ॥५॥