या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगस्ट १८९९. तयांच्या नखाची परांच्या मुखाला । सरी येइना तत्कृपेच्या सुखाला ॥ अशां सोडुनी अन्य कोणां भजावें । कुठे अन्य देवांस धुंडीत जावें ॥६॥ जगी माउली श्रेष्ठ जी देवतांत । तिच्या मागुनी थोर तत्तुल्य तात ॥ नमस्कारितां 'मातृदेवो भवा' हे । महावाक्य ही वेदवाणीच वाहे ॥ ७॥ असो दुष्ट माता महा जारिणी ही । तरी तीस राहील काया ऋणी ही ॥ नको तीर्थ यात्रा नको देव अन्य । सुखें मातृसेवेंत होईन धन्य ॥८॥ तिचा शब्द झेलावया नित्य सिद्ध । कितीही मनाच्या असो तो विरुद्ध ॥ कुरूपा असो की असो ती छचोर । मला तीच विश्वाहुनी फार थोर ॥९॥ असो पातकी बाप माझा मलीन । तरी तत्पदी नित्य होईन लीन ॥ असो मूर्ख अज्ञान लागोनि खूळ । तरी वंद्य त्याची मला पायधूळ ॥१०॥ कुशब्दं वदो नीट घालो न पोटा । तरी ही तयाच्याच जाईन पोटा ॥ किती तीक्ष्ण बोलो करो मर्मभेद । मला शब्द त्याचे जसे पूज्य वेद ॥११॥ मला बांधिले घातलेही उपाशी । क्षमेलागि जाईन त्याच्याच पाशीं ॥ पिता शंभु माता खरी आदिशक्ति । मला ठाउकी एक त्यांचीच भक्ति ॥१२॥ पित्याची शिरी घेउनी शब्दरत्ने । जिवासारखी बाळगीन प्रयत्ने । पित्याला जरी लेश निंदील वाचा । तरी मी धनी निश्चयें रौरवाचा ॥१२॥ पिता आंधळा पांगळा चोर जार । तयांच्या पुढे तुच्छ गंगा हज़ार ॥ मला चालतां नित्य त्याच्याच वाटें । मनी धन्यता केवढी थोर वाटे ॥१४॥ फिरोनी मिळ पुत्र वाडा रहाया । पितामाय गेल्या मिळेना पहाया ॥ तयांची करी हेलना जागजागीं । तयासारखा कोण सांगा अभागी ॥१६॥ पित्याचा दिसे झोंक अग्नीत शीर । करींना तरी मी क्षणाचा उशीर ॥ तयांचीच आज्ञा मनामाजि ठेवीं । मला ठाउकी अन्य ना देव देवी ॥१६॥ तयांचा जरी म्लान होई मुखेंदू । प्रमादें पडे माझिया अश्रुबिंदू ॥ कडाडोनि तत्काल विद्युल्लता ती। पडोनि करो राख माझी न माती ॥१७॥ पिता माय प्रत्यक्ष ह्या देवमूर्ती । जयांच्या कृपें कामना सर्व पूर्ती ॥ उणीं लेखितो मानतो त्यास तुच्छ । पशू नीच त्याला उणें एक पुच्छ ॥१८॥