या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. असें प्रेम निस्सीम जो पुत्र पाळी । शिवेना तया दुःख कोण्याहि काळी ॥ भला हा मुखें लाभ आमां मिळाला । ह्मणोनी ह्मणा आपुल्या 'कोकिळाला॥ प राजयोग. उत्तरार्ध, E पातंजलीची योगसूत्रे. 4 उपोद्धात. योगसूत्रांस प्रारंभ करण्यापूर्वी, योगाच्या वतीने धर्माचा पाया ज्याच्यावर उभारलेला आहे, त्या एका महत्वाच्या प्रश्नाचा ऊहापोह करण्याचा मी प्रयत्न करतो. जगांतील थोर थोर लोकांच्या मताप्रमाणे, आणि पदार्थविज्ञानशास्त्राप्रमाणेही, हे बहुतेक ठरल्यासारखेच आहे की, एका सूक्ष्म शाश्वत तत्त्वाचे-परब्रह्माचें-व्यक्त स्वरूप ते आमी; आणि त्याच्यापासूनच आह्मी उत्पन्न झालो आहों. सध्यां आझांस जो जन्म प्राप्त झाला आहे त्याच्या पूर्वी आली तेंच तत्त्व होतों, व अंतीही फिरून आमांस त्या पूर्ण शाश्वत तत्त्वालाच जाऊन मिळावयाच आहे. हे गृहित धरून चाललें तर असा प्रश्न उद्भवतो की, ही स. ध्याची असलेली स्थिति चांगली, का ती शाश्वतची स्थिति चागला.. ही जी आमची व्यक्त स्थिति (जन्म) आहे, तीच सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे असें वाटणारे लोक काही कमी नाहींत. ह्यांच्यापैकीच अंमळ अ. धिक विचार करणारे लोक आहेत. त्यांचे असें मत आहे की, आझी एकाच अभिन्न स्वरूपाची व्यक्त स्वरूप आहोत. आणि त्या परिपूर्ण शाश्वत तत्त्वापेक्षाही भिन्न स्थितीच अतिशय श्रेष्ठ आहे. कारण, मुळामध्ये गुण ते कसले असणार ? त्यांची कल्पना अशी वाहते की, तेथे केवळ शून्यत्व, उदासीनता व निर्जीवपणाच भरलेला असला पाहिजे. मजा ह्मणून जी काय ती ह्याच जन्मांत आहे. ह्याकरिता ह्याच जन्माला चिकटून असावें तें बरें. पण त्यापूर्वी ह्या जन्मांतील कांही कोड्याचा उलगडा करणे भाग आहे. प्राचीनकालापासून असा एक सिद्धांत चालत आला आहे की, मनुष्य मरतांना त्याच्या पुण्या