या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९६ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. आपण किती शत्रु मारले, हे दाखविण्याकरितां, काफर लोक गांवाबाहेरच्या शिंवेवर एक जंगी स्तंभ उभारतात. त्याच्या माथ्यावर एक ओबडधोबड मनुष्याची आकृति काढतात. आणि मग प्रत्येक मनुष्य, एक मनुष्य मारला असेल तर एक भोंक पाडून, त्यांत एक मेख मारून ठेवतो. जर त्याने एखादी स्त्री मारिली असेल तर मेख वगैरे न मारतां नुसतें भोंक तेवढें राखतात. - असे सांगत असत की, काफर लोक युरोपियन लोकांसारखे सुंदर असत, व त्यांचे डोळे त्यांसारखेच निळे असत. पण ही गोष्ट निवळ खोटी आहे, असे आतां कळून चुकले आहे. ते अवांतर डोंगरी लोकांसारखेच असतात. त्यांची भाषा संस्कृत भाषेपासूनच झालेली आहे. हे लोक दांडगे, छातीचे, पण अतिशय सुस्त, व चैनी असतात. ह्यांना पावलोपावली दारू प्यावयास हवी. बाबर ह्यांजविषयीं असें ह्मणतो की, त्यांचे पाणी पिणे तेंच सुरापान: प्रत्येक काफराच्या गळ्याभोंवतीं एक चर्मी दारूची पिशवी असावयाचीच. ते मूर्तिपूजक असून, आपल्या देवास कोंबडीं बदकीं वगैरे प्राणी बळी देतात. NET

  • निळे डोळे असणे हे एक युरोपियन लोकांच्या सौंदर्याचे लक्षण समजतात. आमच्या इकडे ज्याप्रमाणे 'तामरसाक्ष' 'राजीवाक्ष,' 'कमलाक्ष किंवा आरक्त नयन' में नेत्रांचे उत्तम सौंदर्य मानितात याप्रमाणे युरोपांत नीलाक्ष ह मामला वरील वर्णनांत मूळांत 'Blue eves' निळे डोळे असा शब्द आहे.

" Then would Philip his blue eyes all flooded with the helpless wrath of tears, 99 Tennyson's Enoch Arden. " Blue were her eyes like the fairy flax." The wreck of the " Hesperus." (Longfellow.) अशी ' blue eyes' किंवा निळे डोळे झटलेल्याची कैक उदाहरणे इंग्रजी काव्यांतून सांपडतात.