या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगस्ट १८९९. १७७ शांतून पातकांश वजा जाऊन जी काय बाकी राहील, त्यांतच तो चिरकाल राहतो. हेच तर्कशास्त्ररीत्या सांगावयाचें तर, जग हे त्याचाच परिणाम आहे. ते आणखी एका पायरीने उच्चस्थितीला पोंचले आणि त्यांतील दरोबस्त पातके काढून टाकलीं, ह्मणजे तोच स्वर्ग ह्मणतां येईल. ही कल्पना सकृदर्शनींच असंबद्ध व पोरकट दिसते. कारण, असे असणेच शक्य नाही. वाइटाशिवाय चांगले असू शकणार नाही, व चांगल्याशिवाय वाईट असूं शकणार नाही. जेथें सारें चांगलेच आहे, वाईट असें मुळीच कांही नाही, अशा जगामध्ये रहाणे हे, संस्कृत तर्कशास्त्रवेत्त्यांनी झटल्याप्रमाणे 'गंधर्वनगरांतील उमाळेच' होत. अर्वाचीन कालांतील कित्येक विद्वान् लोकांकडून दुसरी एक कल्पना बाहेर येते. ती ही की, मनुष्याच्या भाग्याची कमान सदासर्वकाल चढती आहे; तिच्यासाठी रात्रंदिवस त्याची धडपड चालू आहे; ह्मणून ती कधींच लयास जावयाची नाही. ही कल्पना दिसण्यांत जरी गोड दिसते, तरी सुद्धा ती असंबद्धच आहे. कारण, अशी कोणतीच वस्तु नाहीं की जी निरंतर सरळ रेषात्मक गतींत राहील. प्रत्येक वस्तु चक्राकार भ्रमत असते. आपण जर एक दगड घेऊन तो महदाकाशांत फेंकला, आणि तो परत येईपर्यंत आह्मी वांचलों, तर तो पुन्हा नेमका आपल्याच हातांत येईल. कोणतीही सरळ रेषा आपण जर अमर्याद वाढविली, तर ती पुन्हा वर्तुळांतच मिळेल, किंवा तिचें वर्तुळच होईल. ह्मणून मनुष्याचे भाग्य किंवा सद्दी, प्रगतीने वाढतच जाईल, तींत खंड ह्मणून कधीं पडणारच नाही, ही कल्पनाही असंबद्धच होय. थोडेसें विषयांतर आहे तरी, मी हे एक सांगतो की ह्या कल्पनेवरून एक नैतिक गोष्ट उघड होते. ती ही की, आपण कोणाचाही द्वेष करूं नये; सर्वांवर प्रेम धरावें. कारण, अर्वाचीन सिद्धांत असा आहे की, विधुच्छक्तीमध्ये किंवा इतर शक्तीमध्ये, एखाद्या यंत्रापासून जी शक्ति उत्पन्न होते, तीच पुन्हा फेरा घे १. जेथे कोणत्याही गोलाची आकर्षणशक्ति वगैरे नाही, अशा पोकळीत जर दगड फेंकला, तर तो विविक्षित मंडळाचा फेरा घेऊन पृथ्वीप्रदक्षिणा करून आलेल्या गलबताप्रमाणे पुन्हा पूर्वस्थळी येईल हा एक अर्वाचीन काळचा सिद्धांत ठरलेला आहे.-भाषांतरकर्ता.