या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७८ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. ऊन परत त्याच यंत्रांत सामील होते. सृष्टीतील सर्व शक्तींची गोष्ट अशीच आहे. त्याही फिरून मूळ खजिन्यामध्ये आल्याच पाहिजेत. ह्मणून कोणाचाही द्वेष करूं नये. कारण, आपणापासून जी द्वेष्यशक्ति निघते ती, कांहीतरी विविक्षित फेरा घेऊन फिरून आपणाकडेच येते. आपण जर प्रीति केली, तर ती प्रीतिही आपला फेरा पुरा करून फिरून आपल्याकडेच येईल. हे अगदी निश्चित आणि शक्य आहे की, मनुष्याच्या अंतःकरणापासून द्वेषाचा जेवढा अंश बाहेर जातो, तितक्याच झपाट्याने तो तंतोतंत त्यांत परत येतो. त्याला दुसरे कोठे थांबतांच येत नाही. ह्याच रीतीने प्रेमाचे लोंढेही परत त्याच्या कडेसच येतात. दुसऱ्या रीतीने आणि व्यवहाररीत्याही आपणांस समजून येतें कीं, उन्नति किंवा सुधारणा ही कांहीं शाश्वतची नव्हे. कारण, मृत्युलोकांतील प्रत्येक वस्तूला नाश आहे. आमच्या साऱ्या खटपटी व आशा; भीति व आनंद आह्मांस कोठपयेत पुरतील : आमचा अंतकाल आला की सर्व आटोपलें! ह्याच्या इतके निश्चित दुसरे कांहींच नाहीं.. मग ही प्रगति किंवा उन्नतावस्था एका सरळ रेषेत कोठून राहाणार ? ती फक्त बऱ्याच अंतरापर्यंत जाते, आणि पुन्हा परतून ती जेथून निघाली, त्या पूर्व ठिकाणावर येते. कस। पहा. नेब्यूलापासून सूर्य, चंद्र, तारे हे उत्पन्न झाले आहेत. ते कांहीं कालानंतर नाहीसे होतील आणि पुन्हा ते नेब्युलांतच येतील. झणजे त्यांचाच पुन्हा नेब्यूला बनेल. कोठेही पाहिले तरी त हा हीच; आणि असेच व्हावयाचे. वनस्पती, पृथ्वीपासून कांहीं परमाणू घ. तात, आणि फिरून त्या नाहीशा झाल्या ह्मणजे ते परमाणु पृथ्वीचे पृथ्वीला परत देतात. ह्या जगामध्ये प्रत्येक दृश्य वस्त आपल्या सभोवतीचे परमाणु काही कालपर्यंत ओढन घेते, आणि ते पन्हा जेथल्या तथं परत करते. एकच नियम निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या असण्याचा स१. नवी सृष्टी उत्पन्न होण्याच्या पर्वी सर्वाआधी आकाशामध्ये ढगाप्रमाणे एक तेज उत्पन्न होतें, व त्यांतील काही भाग वेगवेगळे तुटून ते आपआपल्या भोंवती फिरत राहतात व त्यापासून गोल निर्माण होतात. त्या मूळ तेजाला 'नेब्यूला असें नांव आहे. -भां. क