या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगस्ट १८९९. १७९ भव नाही. नियम मटला की, तो एकसारखा असावयाचा. त्याहून अधिक निश्चयात्मक कांहीं नाहीं. हा जसा सृष्टीचा नियम आहे, तसाच तो विचारांसही लागू आहे. विचारही लयास जातात, आणि फिरून ते आपल्या पूर्वस्थळी येतात. आपण त्याविषयी विचार केला किंवा न केला तरी, फिरून आझांला ज्यास परमेश्वर-शाश्वत तत्त्व, किंवा परब्रह्म असें ह्मणतात, त्या मूळ ठिकाणी गेलेच पाहिजे. आपण सर्व परमेश्वरापासून आलो आहों, आणि फिरून त्याच्या कडेच जाण्याला बद्ध झालो आहों. मग त्या परमेश्वराला तुझी वाटेल तें नांव द्या. त्याला परमेश्वर ह्मणा, की ब्रह्म ह्मणा, की सृष्टशक्ति ह्मणा, किंवा तुमच्या मनास वाटतील तितकी शेकडों नांवे द्या. तरी ह्या नियमांत कांहीं चूक व्हावयाची नाही. “ज्याच्यापासून सर्व ब्रह्मांड उत्पन्न झाले, ज्याच्यापासून सर्व जीव जन्मास आले, त्याच्याकडे सर्व परत जाणार.” ही अगदी काळ्या दगडावरची रेषा आहे. सृष्टीचे सारे व्यापार ह्याच नियमानुसार चालतात. एका गोलावर जो व्यापार चाललेला असतो, तोच व्यापार हजारों गोलांवरही चालणार. ग्रहांच्या संबंधानें जें जें काय तुमच्या दृष्टीस पडते, जें जें काय कळतें, तेच पृथ्वीच्या संबंधानें, मनुष्याच्या संबंधाने आणि इतर गोलांच्या संबंधानेंही असावयाचे. लहान लहान लाटा मिळून जशी एक मोठी लाट होते, तशीच लक्षावधि मिळूनही होईल. लहान लहान लक्षावधि प्राणी मिळून जगाचा एक प्रचंड जीव झाला आहे. आणि साऱ्या जगाचा अंत झणजे ह्याच लक्षावधि लहान लहान जीवांच्या अंताचें संमीलन होय. आतां असा प्रश्न उद्भवतो की, परमेश्वराकडे जाणे ही स्थिति, ह्या मनुष्यजन्मापेक्षा श्रेष्ठ आहे किंवा नाही ? योगशास्त्रज्ञ लोक प्रतिज्ञेने सांगतात की ती श्रेष्ठ आहे. ते असें ह्मणतात की, मनुष्याची सांप्रतची स्थिति हीच अधोगति आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर असा कोणताही धर्म नाहीं की जो मानवी स्थितीची गणना उच्च प्रतीत करतो. त्याच्यांतील कल्पना अशी आहे की, मनुष्य हा प्रारंभी पूर्ण आणि पवित्र असतो. आणि मग तो ह्या योनीत पतित होतो. आणखी जाता जातां पतनाला अधिक जागा नाही इतका खाली गेला ह्मणजे मग