या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. त्यास तेथे असा प्रसंग येतो की, तो पुन्हां उच्च प्रतीकडे उलट खाऊन आपली प्रदक्षिणा पुरी करतो. प्रदक्षिणा ही असलीच पाहिजे. तो खाली गेला तरी, त्याने पुन्हा वरच्या बाजूकडे उलट खाल्लीच पाहिजे. आणि फिरून त्याचे उत्पत्तिस्थान में ईश्वर, तेथें तो गेलाच पाहिजे. मनुष्य, मूळ ईश्वरापासून निघतो, मध्यंतरी तो मनुष्य असतो, आणि अंतीं तो परत ईश्वरापाशींच जातो. द्वैत स्वरूपामध्ये ऐक्यता पावण्याचा पंथ असाच. अद्वैत मताप्रमाणे आपण असें ह्मणाल की, मनुष्य हाच मुळी ईश्वर आहे, आणि तो त्याच्याकडे पुन्हा जातो. आमची सध्याची स्थितीच जर उच्च प्रतीची असेल, तर तिच्यांत येवढे अनर्थापात व दुःखें तरी का असावीत ? आणि ती लयास तरी कां जावी? हीच जर उत्तम अवस्था, तर ती नाहींशी तरी कां होते ? पतित किंवा भ्रष्ट जी स्थिति, ती उत्तम होऊ शकणार नाही. हीच जर उच्च स्थिति तर तिच्यात येवढा राक्षसीपणा व असमाधानपणा तरी कां? आमचा उच्च स्थितीला जाण्याचा रस्ता, तिच्यामधून आहे, ह्याकरितांच तिला मान द्यावयाचा. आझांस पुन्हा उच्चस्थिति प्राप्त करून घेणे असेल तर तिच्यामधून गेलेच पाहिजे. बी जमिनीमध्ये पेरले झणजे तें पंचतत्वांस मिळते. थोडा वेळ त्याचे पृथक्करण होते, आणि त्यातीलच कांहीं द्रव्यापासून सुंदर झाड येते. प्रत्येक आत्म्याचा भव्य वृक्ष होण्याकरितां तो पतित झालाच पाहिजे. ह्मणून ओघानेच असे दिसते की, मनुष्याची ह्मणून आपण जी स्थिति ह्मणतो, तिच्यापेक्षा उत्तम स्थितींत जाववेल तितकें लौकर गेलेले उत्तम. तर मग आत्महत्त्या करून घेतल्याने आमची ह्या स्थितीतून सुटका होईल की काय ? नाही; मुळींच होणार नाही. तसे केल्याने अत्यंत वाईट मात्र परिणाम होईल. स्वतःला पीडा देणे, किंवा जगाचा कंटाळा करणे, हा कांहीं मुक्त होण्याचा मार्ग नव्हे. आपण निराशेची कांत टाकून ह्यांतून गेले, तरच लौकर उत्तम स्थिति प्राप्त होईल. परंतु येवढे मात्र लक्ष्यात ठेवले पाहिजे की, आहे ही स्थिति कांहीं उत्तमापैकी नव्हे. खरोखर समजण्याला कठीण भाग झटला ह्मणजे ही स्थिति, जिला अति उच्च-ब्रह्मस्वरूप-असें ह्मणतात ती. ही स्थिति कित्येकांना मोठी