या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगस्ट १८९९. भयंकर-केवळ शून्य-पाषाणवत् अशी वाटते. पण खरोखर ती तशी नाही. त्यांना तिचा विचारच मोठा भयंकर वाटतो. हे लोक, पदार्थमात्राच्या स्थिति ह्मणून काय त्या दोनच आहेत असे मानतात. एक दगडाची, आणि दुसरी विचार करणारांची-किंवा बुद्धिमंतांची. ह्या दोनच काय त्या स्थिति असें ह्मणण्याला त्यांना पुरावा काय? विचाराहूनही अत्यंत श्रेष्ठ असें कांहीं नाहींच का ? प्रकाशलहरी अतिशय सूक्ष्म असतात तेव्हां आझांला दिसत नाहीत. त्याच्याहून त्या ज. राशा मोठ्या झाल्या ह्मणजे आमांला दिसू लागतात. त्याहून जरा आंधारच होतो. परंतु आरंभाला जसा आंधार असतो, तसाच पुढे शेवटींही आंधारच असतो काय ? खचित नाही. हा दोन शेवटांतला फरक आहे. दगडाचा विचार शून्यपणा आणि ईश्वराचा विचार शून्यपणासारखाच काय ? नाहीं; खरोखर नाही. ईश्वर जाणत नाही; विचार करीत नाहीं; आणि कशाकरतां ह्मणून करावा ? विचार केल्यावांचून त्यास समजत नाही, असे काही आहे काय ? दगडाला विचार करता येत नाहीं; आणि परमेश्वर विचार करीत नाहीं; किंवा त्याला करावा लागत नाही. येवढाच काय तो फरक. जे कोणी तत्वज्ञ असतात, त्यांस असे वाटते की, विचाराच्या पलीकडे आपण गेलों तर, कांहीं तरी मोठे भयंकर असेल. विचाराच्या पलीकडे त्यांना काही दिसतच नाही. परंतु विचाराच्या पलीकडे उच्च प्रतीच्या स्थिति पुष्कळ आहेत. धार्मिकप्रवृत्तीची पहिली स्थिति सुद्धां खरोखर बुद्धीच्या पलीकडचीच आहे. आपण विचाराच्या, बुद्धीच्या, आणि तर्काच्या बाहेर पाऊल टाकलें, की आपण ईश्वराकडचा एक मुक्काम गांठला असे समजावें. आणि तोच जन्मास प्रारंभ. ह्या ज्या स्थितीला साधारणपणे जन्म असें ह्मणतात, ते केवळ ह्या पुढील जन्माचे डोहळेजेवणच होय. आतां दुसरा असा प्रश्न उत्पन्न होईल की, ही जी विचाराच्या आणि तर्काच्या बाहेरची स्थिति, . तीच उच्च प्रतीची आहे, ह्याला पुरावा' काय ? तिला पहिला पुरावा हाच की, नुसती तोंडाने