या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८२ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. बडबड करणाऱ्या लोकांपेक्षां पुष्कळपटीने मोठे, सारे जग हालवून सो. डणारे, ज्यांच्या मनांत विषयांची कधी कल्पनाही येत नाही, असे लोक निश्चयाने सांगतात की, हा जन्म त्या रस्त्यावरचा. एक लहानसा मुक्काम आहे. अफाट महासागर तो पुढेच. दुसरें, ते इतकेंच ह्मणून राहत नाहीत, तर तो रस्ता त्यांनी प्रत्येकाला उघडा करून ठेवला आहे. आपल्या पश्चात् आपले मार्ग त्यांनी खुले ठेवले आहेत. आणि त्यावरून पाहिजे त्याला जातांही येते. तिसरा पुरावा हा की, दुसरा कोणताही मार्ग राहत नाही. त्याला दुसरी तोड ह्मणून नाहीच. ह्याच्या पलीकडे श्रेष्ठ स्थिति नाहींच असे गृहित धरून सारा दिवस आह्मी ह्या उच्च ह्मणविणाऱ्या चक्रांतूनच गिरक्या खात कां बसावे ? ह्याचे कारण जग काय सांगेल ? आमांस जर पुढे जातां न येईल, पुढची आह्मी कांहींच विचारपूस न करूं, तर आमच्या डोळ्यांपुढे जेवढे काय येते, तेथपर्यतच आमच्या ज्ञानाची सीमा होईल. शून्यवाद ह्मणतात तो ह्यालाच. इंद्रियें ज्ञान देतात तेंच खरें कशावरून ? जो मनुष्य रस्त्यावर स्वस्थ उभा राहून मरेल, त्यालाच मी खरा शून्यवादी ह्मणेन. बुद्धीनेच जर सर्व चालतें, तर ह्या शून्यवाद्यांचा पक्ष घेण्याला आह्मांला जागाच नाही. पैसा, कीर्ति, नांव ह्यांची चिकांटी न सोडतां मनुष्य शून्यवादी बनेल, तर तो कपटी किंवा दांभिक असला पाहिजे. कांट ह्मणून एक विद्वान् होऊन गेला. त्याने असे सिद्ध केले आहे की, तर्कशक्ति ह्मणून जी एक अजस्र पक्की तटबंदी आहे, तिच्या प. लीकडे आपणांस जातां येत नाही. परंतु आर्य लोकांच्या विचाराचा अगदी मूळ पाया तर त्याच्यावरच आहे. त्याच शोधाला ते लागतात, आणि त्यांत विचारातीत असलेले कांही त्यांच्या हातींही पण लागते. आणि त्यांत ह्या आपल्या सद्यस्थितीचा अगदी स्पष्ट उलगडा होता. जगाच्या पलीकडे नेणारे जे, त्याच्या यत्किंचित् अभ्यासाची किंमत खालच्या वाक्यांत लिहिल्याप्रमाणे मिळते. " आमचा पिता तूंच; आणि ह्या अज्ञानसागराच्या पैलतीरास पोचविणाराही तूंच.” जे आपपास येथे पोंचवील तेंच धर्मशास्त्र; त्याहून अन्य नाही. ति ह्या आप त्याच्या . आमचा 0