या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगस्ट १८९९. १८३ पुन्हां पंचवटीस्थलनिर्णय. " वादे वादे जायते तत्त्वबोधः". पूर्वी आह्मीं 'पंचवटीस्थला'च्या संबंधाने निर्णय करतांना ओकांचा पक्ष घेऊन कोणी वीर बहाद्दर समरचापल्य दाखवील अशी आह्मांस फारशी आशा नव्हती. निदान ओकांच्या अंतरात्म्यांतील गुप्त ठेवा पुनरपि आमच्या दृष्टीस पडण्याचा तर तादृश संभव नव्हता. परंतु "देवाची करणी अचिंत्य असते भावी न कोणा कळे" ह्या आमच्या 'पोतका'च्या उक्तीची जणों काय लागोपाठ सत्यता करण्याकरितांच तोही अघटित योग जमून आला; व ओक कैलासवासी झाले असूनही त्यांचे हृद्गत पहावयास मिळाले. 'विविधज्ञानविस्तार मासिक पुस्तकाच्या गेल्या फेब्रुवारी व मार्च ह्या दोन महिन्यांच्या अंकांतून आमचे खंडणपर ह्मणून एक झणझणीत असे उत्तर प्रसिद्ध झाले. हा स्थलनिर्णय सार्वजनिक असून पौराणिक आहे. तेव्हां त्याजबद्दल प्रत्येकाचें विवेचन व विचार यथास्थित नमूद होतील तितके सत्य निर्णयाला इष्टच होत. शिवाय, "विविधज्ञानविस्तारा" प्रमाणेच-न जाणों तिसराच एखादा शास्त्री किंवा प्रोफेसर उत्पन्न होऊन पूर्वीप्रमाणे सारे लेख माझेच आहेत असें ह्मणणार नाही कशावरून ? विविधज्ञानविस्ताराने तशा प्रकारचा समाचार घेण्याविषयी एका सेनानीस अति आग्रहाची सूचनाही केली आहे. ह्यास्तव "विस्ताराने " स्वतःच 'तसदी घेतल्यामुळे त्याला जें 'सुरेख फळ' प्राप्त झाले, व त्याने मेहेरबानी करून जें सर्वोस अर्पण केले, त्याचा रसास्वाद कसा काय आहे तें आज पाहूं या. सत्यनिर्णयापेक्षां विद्वत्ता दर्शविण्याची हौस मोठी' असा आमचा ओकांवर आक्षेप होता. परंतु " विस्तारा'च्या प्रचंड महत्त्वाकांक्षेपुढे त्या बिचाऱ्याची काहीच किंमत नाही. त्याचा समज असा दिसतो की, 'तन्नेयबुद्धि' तदनुयायि' 'क्रमप्राप्त ' 'तक्रकौंडिन्य न्याय कंठरवाने' 'अंधजरतीयन्याय' 'उद्धतवाक्य' 'निष्कर्ष' 'प्रशस्तिपत्र' इत्यादि शब्दरूप काळे फत्तर मधून मधून ठासून दिले, भाराभर ग्रंथांचा ढीग वाच