या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८४ ___केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. ल्याची तसदी' घेतल्याबद्दल आपला आपणच ठेभा पाजळला, अर्धा, चोतकर एखादा श्लोकाचा वाळलेला संस्कृत तुकडा पुढें फेंकला, री ओढणारे' 'भिक्षापती' 'परपुष्ट' इत्यादि गांवढळ मनुष्याप्रमाणे गाळिंव गालिप्रदानें आंगावर फेंकली की, न्यायदेवता आपणास भाळलीच, आणि तिने आपल्या गळ्यांत माळा घातलीच ! ह्या समजाच्या नमुन्याप्रमाणेच त्यांनी आपला लेख चितारला आहे. त्याने आमच्या एकशतांश मुद्याचे जरी खंडन केले असते, तरी, त्याच्या प्रत्येक कर्णकटु शब्दाला आह्मीं मोठे स्तुतिस्तोत्र मानले असतें ! परंतु अरेरे ! केवढी दुःखाची गोष्ट ही की. इतके हातवारे करून प्रतिपक्षास तिळभरही चट्टा न लागतां स्वत:च्या आंगाच्या मात्र चिरफळ्या उडाल्या ! ह्यास्तव आपला कुढा दाम राजरोस लोकांपुढे मांडून वादाचा पुढाकार घेऊन आपल्या मित्राचे मंडन, व आमचें-किंवा श्री० करुदवाडकरांचे खंडन करणाऱ्या प्रचंड विस्ताराची कशी दशा-किंवा दुर्दशा-झाली आहे ती आता वाचकांस दाखवू. हणजे त्यांसही त्याची कीव आल्यावांचून राहणार नाही. .१ महाराष्ट्रभाषामहोदधींत सफरी करणारांना ही गोष्ट काही सांगावयाला नको, की 'तसदी' हा शब्द दुसऱ्याने कष्ट सोसले, तर त्यासच लावतात. आपण श्रम केलं तर त्यास 'तसदी' ह्मणत नाहीत. आणि कोणी ह्मणेल तर निखालस आत्मप्रौढी होय. येवढी गोष्टही तेवीस वर्षे लेखणी झिजविणाऱ्या विस्तारास कळू नये, हे कशाचे लक्षण ? 'काव्यसंग्रहा'च्या नव्या संपादकांनीही परवांच्या (९२) एका अंकांत अशीच एक चमत्कारिक चुकी केली आहे. त्या अंकांत मुक्तेश्वराचा कविता छापतांना एके ठिकाणी शृंगाररसांत काही शब्द आले. ते ह्या नवान संपादकांस अत्यंत बीभत्स वाटले. ह्यास्तव त्यांनी ते वगळून तेथें कोरी जाग। सोडली आहे. खरोखर तसे करण्याची तितकी आवश्यकता असेल असे वाटत नाही. कारण, चिपळुणकरांसारख्यांनी कालिदासाचे असलेच ग्राम्य शब्द टोपमध्ये दाखल केले होते; व ओकांनीही मयूरपंतांच्या साधुरीति आयांतील "+टांत तुझा गुरु हा' इतके स्पष्ट बीभत्स शब्द सुद्धा राजरोसपणे नमूद केले आहेतं. मग नव्या संपादकांस तरी येवढे वाईट कां वाटावें? बरे वाटले तर वाटल, ते शब्द सोडून दिले आहेत' इतकेंच सांगून लेखण आवरावी की नाही ? पण है। तसे केले तर नवीन तत्व व वरकडी ती कसली? नवीन काव्यसंग्रहकार ह्यावर आपली धन्यता सांगतात की. ह्याबद्दल वाचकांनी आमचे आभार मानिले पाहिजेत. असें मारून मुटकून 'प्रशस्तिपत्र' बळकावणारी ही विद्वद्वयाची जोडी अपूर्वच खरी!!