या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगस्ट १८९९. १८५ केरळकोकिळा'ने श्रीमंतांच्या पाठीमागे 'री' ओढली असेल-पण "विस्ताराने ओकांच्या मागे तुणतुणे धरून व पुढे डफावर थाप मारून कोणता दिग्विजय केला, त्याचा तपशील आतां मुद्देवारीनेच दाखल केला झणजे बरें, १ आमच्या पूर्वीच्या लेखांत आह्मीं असें झटले होते की " प्रस्तुत वादांत ओकांनी इंग्रजी, संस्कृत तीस चाळीस ग्रंथांची यादी दिली आहे. श्री० कु. रुंदवाडकरांनी ते सर्व ग्रंथ लक्ष्यपूर्वक चाळून त्यांतील आपल्या पक्षाची वचनें काढून शिवाय, दहा बारा नूतन संस्कृत पुराणादिकांतून काढलेले जादा उतारे सामील केले आहेत. इतके सारेच ग्रंथ मलबारासारख्या दूरदेशी मिळणे केवळ दुरापास्त आहे. कारण, श्रीमंतांस सर्व अनुकूलता असतांही कित्येक ग्रंथ उपलब्ध झाले नाहीत. आणि आमच्या मते तितके ग्रंथ पुनरपि चाळित बसण्याची आवश्यकताही पण नाही. दोहों पक्षांकडील साधक बाधक पुरावा पाहून निर्णय होण्यासारखा आहे." ह्यावर मंडण करणाऱ्या " विस्तारा'चे वाक्पाटव: "आमच्या केरळकोकिळकारांनी एक देखील ग्रंथ पाहण्याचा विचार मनांत आणिला नाही; व त्याचे कारण, श्रीमंतांसारख्यांस सर्वानुकूलता असतां जर कांहीं ग्रंथ मिळाले नाहीत तर केरळासारख्या ठिकाणी ते कोठून मिळणार ? अशा समजुतीवरच ते स्तब्ध बसले, नाहीतर आमच्या-किंवा केरळकोकिळकारां-सारख्या भिक्षापतीस यत्न केला असतां हवा तो ग्रंथ चार दिवस पहाण्याकरितां मिळणे कठिण नाही. परंतु सत्यनिर्णयाकरितां ग्रंथावलोकनाची इच्छा मात्र पाहिजे होती." स्वपक्षाचा बिनतोड मोड झाल्यामुळे "विविधज्ञानविस्ताराच्या मनाचा जर हिरमोड झाला नसता, परबलाच्या पराभवाने पिसाळून जाऊन तो जर वेडा झाला नसता तर आमच्या १८७ पानांतील "मेघदूत, प्रसन्नराघव, भारतस्थलादर्श इत्यादि ग्रंथ आह्मींही चाळून पाहिल्यावरून श्रीमंतांप्रमाणे आमचीही पण खात्री झाली आहे." हे वाक्य त्याच्या डोळ्यांस दिसलें असतें. व 'एकही ग्रंथ पाहण्याचा विचार कोकिळाने मनांत आणला नाही' असें खोटसाळ विधान त्याच्या लेखणीतून उतरले नसते. पण करणार काय ? साराच डाव अडला, आणि बाजू आंगावर शेकली, तर लांकडांच्या बुद्धिबळांची टाळकी फोडण्यावांचून दुसरा जसा कांहींच उपाय रहात नाही, त्याप्रमाणे "विस्ताराला "ही ' शेषं कोपेन पूरयेत् ' ह्याशिवाय मार्गच उरला नाही ह्याबद्दल वाईट वाटते ! तसेंच केरळामधील जुने सर्व ग्रंथ ताडपत्रावर मल्याळी २४