या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. भाषेत लिहिलेले असल्यामुळे परकीय मनुष्यास त्यांचा लाभ होणे किती कठिण आहे ह्याचें ॥ विस्तारा "च्या ठिकाणी परिपूर्ण अज्ञान असल्यामुळे त्याची लेखणीरूप रसना भलतीकडेच वहावली, नाहीतर तसें होतेंना. "विविधज्ञानविस्तारा"चा एक ग्रहच बनून गेलेला दिसतो की, सत्याचा निर्णय करावयाचा झटले की, अगोदर भाराभर ग्रंथांच्या यादीची गुंडाळी पुढे केलीच पाहिजे, मग ते ग्रंथ त्या सत्यनिर्णयाला लागू असोत की नसोत; त्यांचा बादरायणी संबंध लागला तरी परे. ते ग्रंथ वाचलेले असोत वा नसोत, निदान ते ग्रंथ वाचल्याची आपली आपणच 'तसदी' घेतल्याची घमेंडी मारली ह्मणजे बस्स्. दूध पिण चांगले, पण ताप आल्यावर नव्हे, औषध घेणे चांगलें, पण ताप आल्यावर, हा नियम सोडून देऊन एखादा मनुष्य आपला उगाच्या उगाच कायनाईन, पेपसाइन, क्लोरोडाइन घेत बसला, तर त्याच्या शहाणपणास काय ह्मणावें ! तद्वत् ज्या सत्यनिर्णयांत विशेष ग्रंथ पाहण्याची गरज राहिली नाही, त्यामध्ये विनाकारण मोठमोठाल्या ग्रंथांची नांवनिशी सांगत बसणे, किंवा आपली पोकल विद्वत्ता चव्हाट्यावर मांडण्यासाठी गिरणींतल्या पेंडीप्रमाणे श्लोकांचे अर्धे अर्धे पाव पाव तुकडे पुढे मांडणे हा शुद्ध वेडेपणा होय. हीच पद्धति ओक व विस्तार ह्या उभयतांनीही अंगीकारल्यामुळे ह्यांच्या झालेल्या तारांबळीची मौज पुढच्या मुद्यांत वाचकांस पहावयास मिळेल. या २ आतां दुसरा मुद्दा झणजे ओकांनी स्वमतपुष्टयर्थ तीस चाळीस ग्रंथांची दिलेली यादी हा होय. ह्या यादीच्या संबंधाने आह्मीं असें हटले होते की, हीत ओकांच्या तर्फेचा एकही शब्द नसल्यामुळे ती एक विद्वत्त्वदर्शनाची फुसही होय. ह्यावर विस्ताराचा कोटिक्रम येणेप्रमाणे आहे:“श्रीमंतांची व तदनुयायी कोकिळकार यांची अशी समजूत झाली आहे की, रावजींनी जी ग्रंथांची यादी दिली आहे, त्यांतील सर्व पुस्तके त्यांच्या पास बळकटी आणणारी आहेत. परंतु ही त्यांची मोठी भ्रांति आहे. असे समजण्यांत त्यांची मोठी चूक झाली.” . ओकांनी दिलेली ग्रंथांची यादी त्यांच्या तर्फेची नव्हती, आमच्या तर्फेची होती, हे समजण्यात आमची एक चूक नव्हे सात चूक आहे ! वादीकडचे वसील प्रतिवादीच्या पुराव्याचे कागदपत्र खटल्यात सामील करीत असतात, हा अपर्व शोध आजपर्यंत आह्मांस माहित नव्हता ह्याबद्दल खरोखरच दिलगिरी वाटते ! ! पण आह्मी दिलेले ग्रंथ आमच्या पुराव्याचे नव्हेत, असें ह्मणण्यांत