या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मंथन २- toअंक १० वा. अक्टोबर १८९८. 'अन्याय-निखालस जुल्म-होय. ते तिला मुळींच रुचलें नाही. शिवाय, तसे केल्याने ज्या लोकांवर आपण राज्य करणार, ते लोक आपणास एक अनाथ अबला न समजतां, मी ह्मणजे राज्य हिसकावून घेणारी जुलमी स्त्री असें/ समजतील. ह्या योगाने तिचे दुःख इतके वाढले की, ती तत्काल अजारी पडली, आणि हवा बदलण्यासाठी तिला परठिकाणी न्यावे लागल२) ° CC22 इकडे बापास आणि सासऱ्यास तर काय, वर्ग सारा तीन बोटें उरला होता. ते आनंदाने मनांत मांडे खात, राजवाड्यांतील मनुष्य अनुकूल करून घेऊन, राज्याभिषेकोत्सवाच्या तयारीच्या धामधुमीत होते. जेन ग्रेच्या दुःखाची त्यांच्या अंतःकरणांत तिलमात्रही कल्पना नव्हती. सर्व सिद्धता झाल्यानंतर जन ग्रेचा बाप, सासरा व नवरा हे त्रिवर्ग एक सुंदर होडी तयार करून इ० स० १६५३ तील जुलई महिन्याच्या १० व्या तारखेस तिला लंदनच्या किल्लयांत घेऊन जाण्यासाठी येऊन दाखल झाले. आणि लेडी जेन ग्रेला हूं, चल चल!" ह्मणून त्यांनी अगदी घाई लाविली. चाललेला हा प्रकार केवळ उतावळीचा छ घातक आहे हे मात्र तिला समजत होते. तरी बापापुढें व सासऱ्यापुढे त्या कोमल व भिडस्त मुलीच्याने कांहीं उत्तर देववेना. ती काही वेळ तटस्थ राहिली, आणि पुन्हा हुंदका येऊन रडू लागली. तरी त्यांनी तिला हाताला धरून बळें बलें होडीत नेऊन बसविलीच. राज्ञीपदास शाभल, अशी होडीही मोही सांगारलेली होती. तिच्या मध्यावर तिला बसण्यासाठी उच्च सिंहासन लेली होती. तिच्या मोल तयार केले होते. मस्तकावर बहुमोल चांदवा असून त्यास मौक्तिके. लटकावली होती. तिच्या पाठीमाग सवेसाठी दासदासी तत्पर होत्या. तरी जेन ग्रेच्या डोळ्यांतील अश्रु काही खळेनात. ती एकसारखी रडत होती. डोळे व गाल अगदी लालभडक होऊन गेले होते. तिचा पति, तिच्या शेजारी बसून वारंवार तिचे सांत्वन करीत होता. बाप आणि सासरा हेही काही समजुतीच्या गोष्टी सांगत, व पुढील बेत करीत त्या होडीत जवळच बसले होते.. - अशा स्थितीनें लेडी जेन ग्रे लंदच्या किल्लयांत येऊन दाखल झाली. तिने किल्ल्यांत पाय ठेविला तेव्हां, हे दोघे ड्यूक, व इतरही