या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगस्ट १८९९. १८७ केवढा वेडेपणा आहे, ह्याची कल्पनाही विस्तारास न व्हावी ही अत्यंत खेदाची गोष्ट होय, असें ह्मणणे झणजेच आपल्या पक्षाचा पराभव झाल्याचा 'कंठरव' करणे, व आपला अभिमान धुळीस मिळविणे, ह्याचेही त्यास भान राहिले नाही. असो. विस्ताराने आमची 'भ्रांति ' व 'चूक' तर सपाट्याबरोबर ठोकून दिलीच, पण पुढे पडली पंचाईत. आतां हे ग्रंथ आपल्या तर्फेचे नव्हेत, तर कोणाच्या तर्फेचे ह्मणून सांगावेत ? तेव्हां त्यावर शक्कल काढून ह्मणतात:"हे ग्रंथकार ( ग्रंथ नव्हेत अं!) या वादाच्या उपांगास आवश्यक आहेत." उदाहरणार्थ:-'बृहत्संहिता" कशाला ? तर ह्मणे भूगोल पहाण्याला. आणि Traveller's Guide मग ते कोणचेही असो. अलाहाबा. देपासून चित्रकूटाची लांबी काढण्याच्या उपयोगी पडलें ! पण त्याचा तसा मूळच्या लेखांत उल्लेख करावयास नको होता काय ? नाही तर प्रतिवादीला त्याचे काय स्वप्न पडत असते ? आणखी, अशाच उपयोगाचे ग्रंथ जमा करावयाचे असतील, तर त्यांना ठेवावयाला सबंध वाडा सुद्धां पुरा पडावयाचा नाही. वेबस्टरचा मोठा कोश; कशाला ? 'गाइड' शब्द काढावयाला. आपट्यांची संस्कृत डिक्शनेरी; कशाला ? 'अंधजरतीय ' 'तक्रकौंडिन्य' इत्यादि न्याय शोधून काढावयाला. रावसाहेब सीताराम विश्वनाथ पटवर्धन बी, ए. कृत ग्रंथ अंकलिपी; कशाला ? एकंदर योजनांची बेरीज करावयाला उपयोगी पडेल. मराठी शुद्ध लेखनाचे नियम; कशाला ? लिहितांना एखाद्या शब्दाचा संशय आल्यास काढून पहाण्यास होईल उपयोग. 'विविधज्ञानविस्तार; ' कशाला ? नाही तर तो लेख छापावयाचा कशांत? पौर्वात्य व पाश्चात्य सूपशास्त्र; हे कशाला ? अहो ! अन्नामध्ये जी प्रसन्नता असते, तीच लेखामध्ये खुलून उठते. ह्याकरितां आधीं यथाशास्त्र अन्न तयार करविणे हे पहिले काम ! ! अशाच पद्धतीने मनुष्य जर आपले उपांगवैभव दाखवू लागेल, तर तें संपणार कधी? नकाशावरून दोन स्थलांमधील अंतर काढणे झाले, तर लहान मुलें सुद्धा स्केलाच्या रेषेवर जानवें लावून काम करून घेतात, मग चित्रकूटाचें अंतर काढावयाला 'गाइड' तें कशाला पाहिजे ? परंतु आपल्या समर्थनार्थ ' झणून यादी पुढे करून मागाहून तींत आमचा पुरावा नव्हता-ती फक्त उपांगभूत होती-हणून 'विनाकारण प्रतिपक्षास वाचनाची तसदी पडली'