या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८८ केरळ कोकिळ, पुस्तक १३ वें. असें राजरोस सांगण्याइतका लपंडाव श्रीमंतांच्या जुन्या शाळेत नव्हता त्यास उपाय नाही, " निर्णायक स्थळे दाखवावयाची होती ती त्यांनी आपल्या मूळ उत्तरांत स्पष्टपणे उतरून घेतली आहेत. तेव्हां बाकी राहिलेल्या ग्रंथांत उल्लेख नाहीं असें प्रत्येक ठिकाणी लिहिण्याचे त्यांस जरूर नव्हतें." मग भाराभर ग्रंथांची यादी दिली ती कशाला ? आत्मप्रौढी किंवा घमेंडी ती हीच, कां तिला आणखी शिंगे असतात ? पण पुढच्या सिद्धतेची मजा ऐकाः "हा यादीचा उल्लेख व विचार श्रीमंतांनी प्राधान्येंकरून केल्यामुळे आमांस एका गोष्टीचा निर्णय करतां येत आहे. तो हा की, जनस्थान व पंचवटी ही स्थळे वामनरावजींनी भद्राचलंजवळील मानल्याने सर्व रामायणे व अलीकडील कवि अडाणी ठरतील; सर्व भलभलतें विसंगत होईल' अशी जी श्रीमंतांस धास्ती होती ती निदान या यादीत उल्लिखित शंभर (!) रामायणांपुरती तरी निर्मूल झाली." "मुळी इंग्रजी व मराठी मिळून सारी एकावन्न पुस्तकांची यादी. त्यांत शंभर रामायणे आली कोठून ? कोठच्या गणितशास्त्रांतील ही वजाबाकी ? ह्यावरून "विस्तारा'चे मस्तक कितपत थाऱ्यावर होते, ह्याचा विचार वाचकांनीच करावा. जे ग्रंथ व त्यांतील वाक्ये त्यांच्या पक्षसमर्थनास आवश्यक होती, ती ता त्यांनी स्पष्टपणे स्थलनिर्देशपूर्वक उतरून घेतली आहेत. तेव्हां ही पुस्तके मिळविण्याच्या व पाहण्याच्या खटपटींत कोणासही पडण्याचे वास्तविक प्रयोजन नव्हते." मग केरळकोकिळानें ग्रंथ पाहण्याची आवश्यकता नाहीं, झटले ह्मणून येवढा हुतुतु घातला तो कोणी ? इत्तलकी बात तित्तल करणाच्या तोंडाला तोंड ह्यणावें का तोबरा ह्मणावा ? कोणताही ग्रंथ पाहण्याचे प्रयोजन नव्हते, तर आपण स्वतः भिक्षापती बनून-दुसऱ्याला बळेच आपल्या कंपूत ओढून साचे उंबरठेन् उंबरठे झिजविले ते कशाला ? वामनरावजींचे हे वकाल परोपकारीच खरे. कारण, ते निर्मल अंतःकरणाने प्रतिवादाचाच पुरावा भक्कम करून सोडतात ! ३ ह्यापुढे " विस्ताराने " मुख्य मुद्याकडे मोर्चा वळविला आहे. विद्वतेचें सारे भांडार काय ते ह्यांतच खर्ची पडले आहे. विस्तार ह्मणतात "प्रथमतः वादाचे मुद्दे तीन होते. त्यांतील ओकांनी दीड मुद्दा मणजे एक सबंध व एक अंशतः आपल्या आंगावर आला असें प्रांजलपणे कबूल केलं आहे." बाकी राहिला अवघा-त्यांच्याच मताप्रमाणेदीड मुद्दा! तो पंडितांनी प्रत्यक्ष नसला तरी परंपरया कबूल केला आहे इतकेंच ! ना त्याचे आणखी स्पष्ट विवेचन करू. विविधज्ञानविस्तार ह्मणतात: