या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगस्ट १८९९. “या वादास साधकतम केवळ वाल्मीकी रामायण हा ग्रंथ होय, असा वामनरावांचा स्पष्ट आशय आहे. या वामनरावांच्या मुख्य आधाराविषयीं श्रीमंतांचें काय ह्मणणे आहे याचा कंठरवाने उल्लेख झाला पाहिजे होता. परंतु श्रीमंतांनी तसें कोठेही केलेले आढळत नाही.” ह्याप्रमाणे वाल्मीकी रामायणाला विविधज्ञानविस्तार हे साऱ्या वादाचा भक्कम पाया समजतात. पण त्यांचे जिवलग मित्र ओक काय ह्मणतात तें पहाः " या प्राचीन इतिहासामध्ये स्थलस्थितिसंबंधाने सर्व आंधारगारूड भरलें आहे. या दोन गोष्टींचा नीटसा निर्णय नसल्यामुळे विलक्षण घोंटाळा उत्पन्न होतो. तेव्हां या दोन गोष्टींसंबंधाने निर्णय करावयाचा तो केवळ अनुमानधबक्यावर करावा लागतो. .....'वर दिलेल्या रामयात्राक्रमांत वाल्मीकीनें क्वचित् क्वचित् प्रसंगी स्थलांतराचे प्रमाणांचा व दिशांचा उल्लेख केला आहे, तो जर सर्वत्र असता तर स्थलस्थितिसंबंधाचा घोंटाळा बराचसा कमी झाला असता. शिवाय अंतरप्रमाणे जी दिली आहेत ती सर्वत्र दिली असती तर त्यांचा आजकाल चालू असलेल्या अंतरप्रमाणांशी मेळ घालावयास बरेच साधन झाले असते. परंतु वाल्मीकीलाही या गोष्टींची जरूरी वाटली नसावी किंवा माहितीही नसावी." हे ओकांचे आंधारगारूड कोणीकडे, आणि "विस्तार" लेखकाचें झगझगीत 'कंठरवाचे ' ब्रह्मास्त्र कोणीकडे ? 'विद्यार्थ्याची' आकलनशक्ति आणि परिशीलनशक्ति लोकोत्तरच खरी ! तात्पर्य काय, की वाल्मीकी रामायणांत जनस्थान ह्मणजेच हल्लींचें नासीक असा स्पष्ट उल्लेख नाही, व तसे असणे साहजिकच आहे. कारण नासीक हे नांव आलीकडचे आहे. आणि ह्मणूनच ह्या उभय पंडितांना आपलें थोतांडी मत सजवावयाला येवढा द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे, व निसटतां निसटतां बेजार व्हावे लागत आहे. तेव्हां ओकांनी वाल्मीकी रामायणाच्या संबंधाने पंधरा पाने खर्ची घातली, आणि श्रीमंतांनी दोनच पानांत त्याचा बेवारा करून इतर विचारांनी बाकीची पाने फुगविली, ह्या ह्मणण्यांत तथ्य तें कोणते ? वाल्मीकी रामायणांत संदिग्धता आहे, ह्मणूनच इतर गोष्टींचा ऊहापोह करणे भाग; आणि इतर गोष्टींचा ऊहापोह ह्मणजे परंपरया वाल्मीकी रामायणाचाच ऊहापोह करणे होय. येवढी उघड गोष्टही नाणावलेल्या लेखकांस कां कडूं नये ? ' हे सर्व चुकीच्या समजुतीमुळे ' व दुराग्रमुळे ' झाले आहे. ' चित्रकूटाहून राम पुढे निघाल्याची तंतोतत दिशा वा. ल्मीकी जर सांगत नाही, तर त्या रामाला भद्राचलंकडेच कां वळवावा ? नासीकाच्या रोखाने कां वळवू नये १ जनस्थानारण्याची पश्चिम सीमा नासीका