या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९० - केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. पर्यंत कां आणून भिडवू नये ? ह्या संबंधाने कोकिळ पु. १३ अं. ४ मधील रा. रा. केतकरांच्या पत्रांतील दंडकारण्याच्या सीमा ध्यानात घेण्यासारख्या आहेत. त्याचा विस्तृत विचार व आधार पुढे येईलच, व मुद्याचा प्रश्न आला की, आमचे तेवीस वर्षांचे अनुभविक संपादक व टीकाकार कसे मूग फोडूं लागतात, तेंही दाखविण्यात येईल. तूर्त विस्ताराच्याच विधानाचा विचार करूं. " श्रीमंतांना वाल्मीकीने दिलेले रामाचे मुक्काम संमत आहेत. परंतु ओकांनी दिलेला नकाशा मात्र भरंवसा ठेवण्यालायख नाही, हे ह्मणणे थोडेसें धाष्टये आहे, व 'अंधजरतीय न्यायाने विसंगत होय." वरच्या गोष्टीचा विचार केला झणजे ह्यांत 'धाष्टर्य'ही नाही व । विसंगतपणाही पण नाही. आणखी 'वामनरावजींनी परिश्रमपूर्वक तयार केलेला नकाशा असंमत होता तर श्रीमंतांनी मूळ रामायणांतील दिशा व अंतरें साधून नकाशा द्यावयाचा होता है "विस्तारा"चे झणणे. परंतु "विविधज्ञानविस्तारा"स व ओकांस तरी अंतरें साधून नकाशा काढावयाची माहिती आहे काय ? जर असती तर त्यात 'स्केल' दिलेच असते. ह्या पंडितांनी स्केलाशिवायच नकाशा चव्हाट्यावर आणला आहे. जणों काय बायकांची गोपनेच ! येवढी स्केलाची चुकवाचुकव कां ? स्थलनिदेशाचे बेंड बाहेर पडेल ह्मणून ! : वादप्रसंगी असा नुसता उडवाउडवीचा प्रकार श्रेयस्कर होत नाही, व निर्णय करणाऱ्यास तो उडवाउडवी करणारा पक्ष लहान वाटतो.' 'याप्रमाणे पाहतां ओकांचा व त्यांच्या पाठीमागन री ओढणाऱ्या, "विस्तारा"चा पक्ष 'अगदी दुर्बल आहे असें ह्मणाव लागतें' आणि ' हीच स्थिति कायम धरल्यास' श्रीमंतांचा 'पक्ष सर्वथैय खरा होऊ पाहतो.' नकाशांतील रामाचा मार्ग आह्मांस पसंत नाही झटल्यावर आणखी निराळा तो काय दाखवावयाचा ? नकाशांत ओकांनी दाखविलेलीच मार्गाची रेषा व स्थळे पश्चिमेच्या रोखाने काढलीं ह्मणजे तंटा मिटला. आणखी नव्या नकाशाची उरस्फोड ती कशाला ? इतक्या उप्पर नकाशावांचूनच वादाचे घोडे तटत असेल, व रा. रा. शेट तुकाराम जावजींस सारा वाद छापणेच असेल, तर तसा नकाशाही आह्मी तयार करून देऊन विविधज्ञानविस्ताराचे हेतु पूर्ण करूं, (पु० चालू.)