या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगस्ट १८९९. १९१ पत्रव्यवहार. “ ये बा घना." श्लोक. आकाश-मंडल तुझ्याविण शून्य वाटे । गेलासि काय निजमंदिरिं अन्य वाटें ॥ की राहिलासि अचलाश्रय तूं करून । ये बा घना जन-निमंत्रण आदरून ॥१॥ वर्षोनि हर्ष दिधलास जयास आधीं । वन्निष्ठरत्व परि सांप्रत फार बाधी ॥ दे एक वेळ तव दर्शन तें फिरून । ये बा घना जन-निमंत्रण आदरून ॥ २ ॥ अन्याय काय घडला जलदा असा रे। कोपोनियां करिसि नीरस विश्व सारें ॥ पाजी तया जल दया हृदयीं धरून । ये बा घना जन-निमंत्रण आदरून ॥ ३ ॥ बा हा तुझा विरह पावक मूर्तिमंत । मार्तड चंड तपुनी करितां जगांत ॥ जाईल त्यांत तव कीर्ति सती मरून । ये बा घना जन-निमंत्रण आदरून ॥ ४ ॥ आहाळती वरि बृहस्पति शुक्र इंदु । ह्या तारका न रजनीचर धर्मबिंदु ॥ जाईल त्यांतिलहि शीतलता सरून । ये बा घना जन-निमंत्रण आदरून ॥ ५ ॥ घेताति पाहुनि अवर्षण रोग धांवा । त्यांचा तुवां कळप धाउनियां वधावा ॥ तो तूंचि गम्मत कसा बघसी दुरून । ये बा घना जन-निमंत्रण आदरून ॥ ६ ॥