या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९२ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. केली जलें प्रथम सर्व तुडुंब शेतें । नाही पुन्हा स्वमुख दाखविलें कसें तें ॥ लभ्यांश काय तुज सांग असें करून । ये बा घना जन-निमंत्रण आदरून ॥ ७ ॥ तूं मायबाप असतां सकलां जनांचा । यावा असा समय ना तृण-भोजनाचा ॥ तें ही नसे विपुल राहुं जरी चरून । ये बा घना जन-निमंत्रण आदरून ॥ ८॥ चिन्हें अह्मां दिसति सर्व महर्गतेची । भावीतसेल हृदयीं पशुवर्ग तेंची ॥ चाराचि पोटभरि त्यां न मिळे फिरून । ये बा घना जन-निमंत्रण आदरून ॥ ९॥ वापी तडाग विहिरी पडल्या रिकाम्या । आक्रंदतां निरखिल्या शुकसारिका म्यां॥ दावू कितीक तरि वर्णन तें करून । ये बा घना जन-निमंत्रण आदरून ॥ १० ॥ देशी न एक कणिकाहि निजोदकाची । होईल काय न कळे गति चातकांची ॥ घेऊ नकोस अपकीर्ति जगीं करून । ये बा घना जन-निमंत्रण आदरून ॥११॥ होऊनि विश्व-असुखार्णव-सेतु तारी । खत्कीर्तिची मजसि वाजउं दे तुतारी ॥ टाकीन अंबर तिच्या ध्वनिने भरून । ये बा घना जन-निमंत्रण आदरून ॥ १२ ॥ "रामदीक्षित." PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJI DADAJI'S "NIRNA YA-SAGARA" PRESS, Bombay.