या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यासाठी सूतथील लोक साधिकारी लोकांना खरी गृहे असे वाकवर संभ वगैरे उभाचमत्कारांत भाग हाच देवाला १९४ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. प्रसिद्ध राज्ये होऊन गेली, त्यांतच इजिप्तची अजरामर नोंद आहे. यासच मिसरदेश असें ह्मणतात. त्या देशांत तांबडी लाल माती असते, ह्मणून ह्यास मिसर झणजे तांबड्या मातीचा देश हे नांव पडलेले दिसते. हा देश आफ्रिकेच्या ईशान्येस आहे. येथे पूर्वी एका काली, ख्रिस्ती शकापूर्वी दोन अडीच हजार वर्षांच्या सुमारास फार भरभराट होती. त्या काली आमचे हिंदुस्थान, चीन, आशिरिया वगैरे राष्ट्रांचाही उदयकाल होता. प्राचीनकाळी इजिप्तचे लोक शिल्पशास्त्रांत चांगले निपुण असत. मातीची भांडी करणे, घरे, मनोरे, स्तंभ, मंदिरें, वगैरे बांधकाम आणि खोदीव कामही, करण्यांत ते लोक वाकबगार होते, असे दिसून येते. मंदिरे हीच आपली खरी गृहे असे ते मानीत असत. रोमन व ग्रीक धर्माधिकारी लोकांत देखील असेंच मानण्याची चाल होती. तेथील लोक सूर्याची उपासना करीत. तोच त्यांचा खरा दव. त्यासाठी सूर्याच्या तेजाचे व शक्तीचे द्योतक ह्मणून तेथील लोक मनार, स्तंभ वगैरे उभारीत. पिरोमिड नामक जे प्रसिद्ध मनोरे आहेत, ज्यास जगांतील सप्तचमत्कारांत आद्यस्थान देतात, ज्यांच्या अचाट कामाचा इतकी तारीफ करतात, ते तरी ह्याच देवतेच्या तेजाचे द्योतक-स्मारक होत. आज आमी शिरोभागी दिलेले चित्र अशांचपैकी एक होय. इजिप्तांतील लोक चिनी लोकांप्रमाणे चित्रलिपीने लिहीत असत, असे यावरून दिसून येते. ह्मणजे हत्ती ह्मणावयाचा झाला तर त्याचे चित्र काढून दाखवावयाचे. घोडा पाहिजे तर तसेंच, कोणतीही वस्तु तिचे चित्र काढून प्रदर्शित करावयाची. वर चित्रांत दिलेला एकस्तंभ दिसत आहे, त्यावर चित्रे आहेत. ती त्या कालच्या चालीरीतींची ध्वनितार्थदर्शक होत. हा स्तंभ सर्वोत्कृष्ट खनिज पदार्थ मिळवून केलेला अगदी अखंड पाषाणाचा होय. त्याचा पृष्ठभाग उत्तम जिल्हई दिल्यासारखा चकचकित आहे. वर लालभडक गुलाबी रंग चमकत असून, त्यांत बारीक बारीक आंखलेल्या सुरेख रेषा खुलत आहेत. खालपासून 1 9 And for the priests in Egypt as for the priests in Greece and Rome, the temple was a house. स (History of the World's Progress.) २ ह्याचे सचित्र सविस्तर व मनोहर वर्णन पुढें सवडीने देण्याचा विचार आहे.