या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्तेंबर १८९९. वरपर्यंत त्याचा आकार चिंचोळा होत गेला आहे; आणि शिखर नभोमंडळाचे चुंबन घेत आहे. अशी त्याची अपरंपार उंची, वर दिलेले मनोहर पाणी व त्यांत खुलणारे प्रकाशकिरणांचे अप्रतिम, नयनाल्हादक रंग, याने तर त्यास विलक्षण शोभा आलेली आहे. अशा तन्हेचे स्तंभ पूर्वकालीं पुष्कळ होते. त्या स्तंभांत एक चित्र कोरले आहे. ते असे की, सूर्य ह्मणून बालाकेतुल्य एक ज्योत सारखी काढली आहे, आणि लोक त्या सूर्यनारायणाची पूजनें करीत आहेत असे दाखविले आहे. अग्रभागी एक असेंच चिन्ह ध्वनित केले आहे. जणों काय मूर्तिमंत सूर्यच बोट पुढे करून, नेटानें कालास हाक मारतो आहे की, "हे काला! आणि हे ऋतूंनो! या या लवकर या. तुमच्या घडामोडी काय काय चालावयाच्या त्या चालूंद्यात. हा मी छाती काढून अढळ उभा आहे" असा आविर्भाव त्यांत दर्शविला आहे. कारागिराने जरी पिरामिडाचे आणि मनोऱ्याचे डिझाइन बरोबर केले नसले, तरी कविकल्पना त्याची बरोबर पूर्तता करील. हा स्तंभ ग्रेनाइट नांवाच्या दगडाने बांधलेला असतो. स्तंभ किंवा मनोरे हा जीवदशेचा आरंभ, आणि पिरामिड हा अंत यांचे द्योतक होय. - वर आह्मीं पिरामिड व मनोरे सूर्यदेवतेचे द्योतक आहेत, ह्मणून सांगितलेच आहे. त्यांत मनोरे किंवा स्तंभ हे सूर्योदयाचे दर्शक व पिरामिड हे सूर्यास्ताचे दर्शक होत. सूर्यप्रकाशाने जगाची उत्पत्ति झाली. ही स्तंभांची-मनोन्यांची-मूलाधार कल्पना होय. आणि सूर्यप्रकाशाचा लोप शेवटी होऊन, जगाचा लय होणार, ही पिरामिडाची होय. आणि हा जो दोहोंतला भेद, तो त्यांवर भिन्न भिन्न चिन्हें रेखून ठेवली आहेत, त्यांवरून स्पष्ट दिसून येतो. शिवाय ते ज्या भिन्न भिन्न स्थितीत आहेत, त्यांवरूनही तो चांगला व्यक्त होतो. हे स्तंभ किंवा मनोरे नाईल नदीच्या पूर्वेच्या तीरावर ह्मणजे जेथे सूर्योदय होतो अशा ठिकाणी आहेत. आणि पिरामिड हे सर्व त्या नदीच्या पश्चिमकिनाऱ्यावर ह्मणजे सूर्यास्ताच्या ठिकाणी दृष्टोत्पत्तीस येतात. पिरामिड ही शेवटची स्थिति त्यांच्या भयाण स्थळांवरून व्यक्त होते. ते जेथें लाल रंगाच्या टेकड्या, भयाण अरण्ये, की ज्यांत एक चिटपांखरूंही फिरकावयाचें नाही, अशा ठिकाणी, किंवा जेथे गर्द