या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. अंधारमय व भयप्रद जागेंत खडक फोडून, थडग्यांत प्रेतें पुरलेली असावयाची, अशा ओसाड, व पाहतांच आंगावर भीतीनें रोमांच उभे राहतील, अशा प्रकारच्या मसणवट्यांत ते सांपडावयाचे. इजिप्तमधील एका जुन्या थडग्यांत एक स्तंभ पिरामिडाच्या मस्तकी उभा केला होता. वस्तुनाश किंवा मृत्यु यावरही आज कोट्यानुकोटी वर्षे जीवित्वाचा झेंडा फडकत आला आहे, हे दर्शविण्याकरितां, तसे केले होते. हे मनोरे केवळ सूर्यपूजेचेच दर्शक होते असे नाही, तर त्यांत त्या कालच्या, ज्या सिंहासनाधीश राजाने ते उभारलेले असत, त्याचे सन्मानार्थ दर्शक ह्मणूनही ते असत. त्या राजांचें नांव, पदव्या, व अधिकार, त्यांतच सूर्याच्या नांवानें कोरून ध्वनित करण्याची चाल होती. कारण इजिप्शियनांची अशी धर्मसमजूत होती की, राजा हा केवळ सूर्यपुत्रच आहे, एवढेच नव्हे, तर तो सर्व मनुष्यजातीच्या वैभवाचे द्योतक होय. ही कल्पना त्यांची जीव की प्राण असे, आणि त्याप्रमाणे हे सूर्याचे व राजाचे दर्शक असत. असे स्तंभ उभारणे हे परमेश्वरशक्तीचे दर्शक ह्मणून इजिप्तांतच चाले, असे नाही. पुरातनकालच्या दरोबस्त राष्टांतही जराजरा भिन्नत्वाने हिचे प्राबल्य असे. पुराणांतरी हिचें खूब वर्णन मिळते. हिंदुस्थानांतही बऱ्याच फेराने ह्या स्तंभांचें-मनोऱ्यांचे वास्तव्य आहे, पण फारच थोडे. पूर्वी अमेरिकेत तर हे सर्वसाधारण असत. आणि आ. सिरिया, इराण येथील पौरजन व फिनीशियन लोक ह्यांचे तर हे आवडते विषयच होऊन बसले होते. हे स्तंभ बाबिलोन प्रांतांत डरा येथील मैदानांत एके कालीं उभारले गेले होते. त्यांची साधारणपणे उंची ६० हात, आणि रुंदी६ हात असे. ही अटकळ महत्प्रयासाने बांधतां आली. हे अशा प्रकारचे मनोरे, बाबिलोन प्रांतांत नेबूच दने झार नामक राजपुरुषाने उभारले होते. त्याने ते आपल्या प्रांतांतील साड्राक, मशाक, आणि आबेडनेगो ह्या शहरी उभे करून, ती सुशोभित करावयास हुकूम फर्मावले होते. पण हे इजिप्तच्या नंतर झालेले होते. अशा त-हेच्या स्तंभांवर सोन्याचे पाणी देत, आणि मातीच्या कामाबद्दल राजास पूजित असत. आणि त्याचा जीवसृष्टीची मूल उत्पत्ति असा लाक्षणिक अर्थ असे. मूर्तिपूजेप्रमाणे ते ह्यांची पूजा मुळीच करीत