या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्तेंबर १८९९. नसत. त्यांनी ते ज्या तेजाचे द्योतक ह्मणून उभारले, तीच काय ती उच्च शक्ति आहे, एवढेच इजिप्तांतील लोक मानीत. अशा स्तंभाचे दर्शन अद्यापि रोम (इटाली)मध्ये घडते. तेथे जर एखादा नवखा मनुष्य गेला, तर त्यास ज्या ज्या वस्तु त्या ठिकाणी चित्तवेधक दृष्टीस पडतील, त्या सर्वांत हे आद्यस्थानी विराजमान झालेले आढळून येतील. ते जुनाट काळच्या वस्तूंची साक्ष पटवितात, व इजिप्तच्या पूर्वकालीन करामतीची ती दिव्य स्मारकेंच झळकत आहेत, . असा पाहणाराच्या मनावर बरोबर ठसा उमटवितात. असे सांगतात की, पूर्वी एके काली रोममध्ये किमानपक्ष ४८ मनोरे उभारले गेले होते. त्यांपैकी सहा फार प्रचंड आणि ४२ लघ्वाकृति होते. ते नाइल नदीच्या तीरापासून टायबर-(इटालींतील) नदीच्या कांठी वाहून नेले होते. त्यास अपरिमित द्रव्य आणि अमूल्य श्रम लागले. त्यांपैकी ३० च्या वर स्तंभ कालचक्राच्या धुमश्चक्रीत कोठे गडप झाले कोण जाणे? त्यांचा मागमूसही उरला नाही. आतां एवढें खरें की, रोममध्ये ज्या प्रचंड उलाढाली झाल्या, त्यांतच ते नाश पावले, हे खचित आहे. पण त कोठं गडप झाले, हा मात्र गहन समीकरणाचा प्रश्न आहे. 1. सुमारे १५० वर्षांपूर्वी एक मनोरा, प्याथेमजवळ सांपडला होता. | तेथे ज्यू लोकांचे देऊळ होते, त्याची साफसफाई चालली असता, त्यावरचा मातीचा ढिगारा निघून, तो सहज दृष्टोत्पत्तीस आला. पण दिलगिरीची गोष्ट ही की, तो वर काढतां आला नाही व शेवटी त्यावर पुन्हां माती लोटावी लागली. ह्मणजे तो त्या देऊळाच्या एका कोपयाखाली, अगदीं छिन्नविछिन्न होऊन पडला होता. आणि इतकेंही असून, लगतच एक जंगी इमारत होती, तिचा एक भाग त्यावर असा काही विलक्षण बसला होता की, तेथें खूब मोडतोड केल्याशिवाय काहीं तो सुरक्षित निघण्याची आशा नव्हती. तेव्हां अर्थातच त्या खारींना जगद्रंगभूमीस रामराम ठोकून, मृत्तिकाच्छादन लपेटून घेऊन, अखंड भूगर्भसमाधि स्वीकारावी लागली. वस्तुतः ह्या मनोऱ्यांची अशी शोचनीय स्थिति आहे तरी, विद्यमानकाली रोममध्ये काही अद्यापही ते अस्तित्वांत आहेत, व जिज्ञासू लोकांस त्यावर चांगला विचार करता येण्यासारखा आहे. हे तरी प्रस्तुतकालच्या शोधकलोकांचे सुदैवच समजले पाहिजे.